Dhirendra Shashtri  
Latest

Dhirendra Shashtri : मी तेंव्हा 9-10 वर्षांचा होतो; मी शपथ घेतली होती… अन् TV वाला किस्‍सा सांगून रडू लागले धीरेंद्र शास्‍त्री

निलेश पोतदार

पाल ; पुढारी ऑनलाईन धीरेंद्र शास्‍त्री (Dhirendra Shashtri) हे नाव आता सर्वांना परिचित आहे. ते त्‍यांच्याकडे येणाऱ्या भक्‍ताची समस्‍या न विचारताच एका चिठ्ठीवर लिहितात. तीच समस्‍या घेवून ती व्यक्‍ती त्‍यांच्याकडे आलेली असते. अन् ते समस्‍येवर उपाय सांगतात, अशी भक्‍तांची धारणा आहे. त्‍यामुळे त्‍यांचा खूप मोठा भक्‍तवर्ग आहे. या धीरेंद्र शास्‍त्रींनी होळीच्या दिवशी एका मुलाखत दिली. त्‍यावेळी त्‍यांनी आपल्‍या बालपणीच्या खास आठवणी सांगितल्‍या मात्र एक गोष्‍ट सांगताना ते रडू लागले.

बाबा बागेश्वर यांना बालपणी टीव्ही पाहाणे आवडायचे. त्‍यासाठी ते त्‍यांच्या शेजारच्या घरात जायाचे. मग ते बऱ्याच वेळपर्यंत टीव्ही पाहत बसायचे. मग त्‍यांचे मन भरले की ते घरी जायचे. या दरम्‍यान त्‍यांच्यासोबत एक घटना घडली.

मी रडत-रडत घरी आलो होतो : बाबा बागेश्वर

धीरेंद्र शास्‍त्री (Dhirendra Shashtri) यांनी सांगितले की, जेंव्हा ते ९ ते १० वर्षांचे असतील, तेंव्हा एक प्रसंग त्‍यांच्यासोबत घडला होता. त्‍यांच्या गावातील एका घरात टीव्ही आला होता. त्‍यावेळी टीव्ही सगळ्यांकडे नसायचा. घरात लाईट नसायची. ज्‍यांच्या घरी टीव्ही आला होता. त्‍यांनी मला टीव्ही पहायला मनाई केली होती. त्‍यांनी माझ्यासाठी त्‍यांच्या घराचे दरवाजे बंद केले होते. जेंव्हा आईने विचारले की, आज लवकर कसा काय आलास? तेंव्हा मी काही नाही सांगितले. अन् घराबाहेर जावून ते एका तळ्याकाठी बसून रडू लागले. हे सांगताना त्‍यांच्या डोळ्यात अश्रू आले.

मी प्रण केला की टीव्ही तेंव्हाचं पाहिन

धीरेंद्र शास्‍त्री (Dhirendra Shashtri) यांनी प्रण केला की, टीव्ही तेंव्हाच पाहणार, जेंव्हा स्‍वत:चा घेईन. ते म्‍हणाले मी जेंव्हा दुसऱ्यांच्या घरी पुरोहिताचे काम करण्यासाठी जात असे, तेंव्हा लोक म्‍हणायचे आमच्या घरी थोडावेळ थांबा टीव्ही पहा. मात्र मी टीव्ही पाहण्यासाठी कधीच थांबत नव्हतो.
आणि मी टीव्ही विकत घेतला

मी तेंव्हा कर्मकांड करत दोन-दोन पाच-पाच हजार रूपये साठवून एक ते दीड वर्षाच्या आत ३८०० रूपये जमा केले. त्‍या पैशातून मी तेंव्हा ब्‍लॅक ॲण्ड व्हाईट टीव्ही आणला. नशीब पहा याच दरम्‍यान ज्‍यांनी आम्‍हाला टीव्ही पाहायला मनाई केली. त्‍यांचाच टीव्ही जळून खराब झाला. तेंव्हा मी लाडू आणले आणि त्‍या शेजाऱ्यांना देवून त्‍यांना धन्यवाद म्‍हटले. (Dhirendra Shashtri) त्‍यांना समजले नाही. त्‍या पाठिमागे कारण होते. ते म्‍हणजे जर त्‍यावेळी त्‍यांनी मला त्‍यांच्या घरातून पळवून लावले नसते, तर आमचा स्‍वत:चा टीव्ही घरात आला नसता. हे सांगताना त्‍यांचे डोळे पाणावले.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT