Latest

Devendra Fadnavis | पायाच्या अंगठ्यानं कपाळावर टिळा लावताच फडणवीसांच्या डोळ्यात तरळले पाणी…

अविनाश सुतार

पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी जळगावमधील दीपस्तंभ फाउंडेशनच्या कार्यक्रमाला नुकतीच उपस्थिती लावली. यावेळी एका दिव्यांग मुलीने पायाच्या अंगठ्याने कपाळावर टिळा लावून फडणवीस यांचे औक्षण केले. यानंतर फडणवीस यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या. बहीण, तुझे स्मित आणि तुझ्या चेहऱ्यावरील चमक सांगत आहे की, तू किती मजबूत आहेस, असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ट्विटरवर या भावूक क्षणाबद्दल लिहिले आहे की, आजपर्यंत अनेक माता भगिनींनी औक्षण केले. आजवर कितीतरी माता-भगिनींनी मला ओवाळलं. कपाळावर आशीर्वादाचा गंध लावला. आजही त्याच भावनेनं अंगठा कपाळाला टेकला पण तो पायाचा… हाताचा नव्हे. आयुष्यात असे हे क्षण येतात आणि आतून-बाहेरून मन थरारतं. अंगावर रोमांच उभे राहतात. डोळ्यांच्या कडा ओलावतात पण क्षणभरच. कारण पायाच्या अंगठ्यानं टिळा लावणाऱ्या, त्याचं पायानं आरतीचं तबक ओवाळणाऱ्या, त्या दिव्यांग भगिनीच्या चेहऱ्यावर हास्य फुललेलं होतं. तिच्या नजरेतली चमक आणि धमक जणू नियतीला आव्हान देत म्हणत होती की "तू काय मला हरवणार? मला कोणाची सहानुभूती नको, दया नको. मी खंबीर आहे."

ते पाहून मी इतकंच म्हणालो, "ताई, तू लढत राहा. आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत." या भगिनीकडून ऊर्जा आणि प्रेरणा घेताना कुसुमाग्रज आठवले . "अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा किनारा तुला पामराला!" तुम्हाला कोणाच्या सहानुभूतीची गरज नाही, तुम्हाला कोणाच्या ममतेची गरज नाही, कोणी तुमचा पराभव कसा करू शकेल. तुमच्या प्रत्येक लढ्यात आम्ही तुमच्या सोबत आहोत, असेही फडणवीस यांनी पुढे लिहिले आहे.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT