Latest

Devendra Fadnavis : मराठा समाजाच्या आरक्षणाला शरद पवारांचा सर्वाधिक विरोध : देवेंद्र फडणवीस

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क : देशाची सुत्रे पुन्हा एकदा मोदींच्या हातात जायला पाहिजेत. नरेंद्र मोदीच देशाला विकसित करु शकतात. देशाला विकसित करण्यासाठी ते सक्षम आहेत. महाराष्ट्रातील सामान्य सामान्य माणसाला मोदींच आकर्षण आहे आणि विश्वासही आहे. अस वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (दि.१६) केले. ते नागपुरात भाजपच्या प्रदेश पदाधिकारांच्या बैठकीत बोलत होते. (Devendra Fadnavis) पुढे बोलत असताना त्यांनी राष्ट्रवादीचे शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले. ते म्हणाले, "मराठा समाजाच्या आरक्षणाला शरद पवारांचा सर्वाधिक विरोध राहीला आहे."

 नरेंद्र मोदीच देशाला विकसित करु शकतात

नागपुरात भाजपच्या प्रदेश पदाधिकारांच्या बैठक आज (दि.१६) झाली. यावेळी बोलत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षावर निशाणा साधत कार्यकर्त्यांना आवाहन केले की, "निवडणुकांची चिंता न करता जनतेच्या प्रश्नांची चिंता करा. आगामी निवडणुकांमध्ये विजयाची भावना ठेवून एकत्र लढायचं." पुढे बोलत असताना ते म्हणाले की, देशाची सुत्रे पुन्हा एकदा मोदींच्या हातात जायला पाहिजेत. नरेंद्र मोदीच देशाला विकसित करु शकतात. देशाला विकसित करण्यासाठी ते सक्षम आहेत. महाराष्ट्रातील  सामान्य माणसाला मोदींच आकर्षण आहे. आणि विश्वासही आहे. लोकांना नरेंद्र मोदींची गॅरंटी वाटते. देशातील बारा बलुतेदारांचा विकास मोदींनी केला आहे. विरोधकांकरिता पक्ष म्हणजे परिवार तर मोदींसाठी देश म्हणजे परिवार आहे. जनतेपर्यतं मोदींच्या योजना पोहोचवण्यासाठी आणि सामान्य माणसाला मोदींशी जोडण्यासाठी भारत संकल्प यात्रा सुरु आहे.

Devendra Fadnavis : खोट बोला पण रेटून बोला

फडवणीसांनी यावेळी इंडिया आघाडीवरही निशाणा साधला. ते म्हणाले, "आपण अतिविश्विस न ठेवता काम करायला हवं, लोकसभा आणि विधानसभेच्या तयारीला लागण्याची वेळ आली आहे. आगामी निवडणूका महायुती एकत्र लढणार आहे. तर इंडिया आघाडीसमोर कोणताही अजेंडा नाही. परिवारवादाला कुलूप लागू नये म्हणून इंडिया आघाडी एकत्र आली आहे. खोट बोला पण रेटून बोला अशी विरोधकांची सध्याची स्थिती आहे.

मराठा आरक्षणाला विरोध शरद पवारांचा

मराठा आरक्षणासंदर्भात बोलत असताना फडणवीस म्हणाले की, " मराठा आरक्षणाला आधी कानाडोळा करणाऱ्या सुप्रियाताई आता मराठा आरक्षणावर बोलत आहेत. तर मराठा आरक्षणाला सर्वात जास्त कोणी विरोध केला असेल तर तो शरद पवार यांनी केला आहे." पुढे बोलत असताना म्हणाले की, "मराठा समाजाकडे व्होट बॅंक म्हणून पाहत नाही, मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रयत्नशिल आहोत. आरक्षणामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये मतभेद नको. मराठा आरक्षणावरुन भाजपाला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जातोय. प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनामध्ये दोन्ही समाजातील बांधवाप्रती आदर असला पाहिजे. तसेच  कोणत्याही परिस्थितीत आम्ही ओबीसी समाजावर अन्याय होवू देणार नाही.  भाजप ओबीसींच्याही पाठीशी आहे.

Devendra Fadnavis : कॉंग्रसेने केवळ नेत्यांना मोठ करायच काम केलं

कॉंग्रेसवर निशाणा साधत ते म्हणाले की, "कॉंग्रेसमध्ये नेते मोठे झाले पण कार्यकर्ते संपले आहेत. कॉंग्रसेने केवळ नेत्यांना मोठ करायच काम केलं आहे.  कॉंग्रेस आता नव्याने उभी राहण कठीण आहे. " पक्षाला मोठ करायचं असेल तर कार्यकर्त्यांना जोडण्याची गरज आहे. आणि भाजपच्या कार्यर्त्यांना मेहनतीची जाण आहे." पुढे बोलत असताना त्यांनी ठाकरे गटावरही निशाणा साधला. ठाकरे गटाचे लोक दाऊदच्या हस्तकाबरोबर डान्स करतात. ठाकरेंच्या शिवसेनेनं आम्हाला हिंदुत्व शिकवू नये.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT