Latest

देवेंद्र फडणवीस चौकशीच्या फेऱ्यात ; मुंबई पोलीसांकडून चौकशी सुरु

backup backup

मुंबई; पुढारी ऑनलाईन : राज्यात खळबळ उडवून देणार्‍या फोन टॅपिंग प्रकरणात चौकशी करण्यासाठी मुंबई पोलिसांनी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना चौकशीची नोटीस बजावली आहे. त्यांची मुंबईतील शासकीय निवासस्थानी सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव, पोलीय उपायुक्त हेमराजसिंह राजपूत देखील उपस्थित आहेत. दुपारी १२ वाजल्यापासून देवेंद्र फडणवीस यांची चौकशी सुरु करण्यात आली आहे.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस चौकशीच्या फेऱ्यात अडकल्यानंतर भाजपच्या संतापाचा पारा चढला आहे. भाजपकडून राज्यभर निदर्शने करण्यात येत आहेत. चौकशीला प्रारंभ होण्यापूर्वी भाजपच्या अनेक नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांना बजावण्यात आलेल्या नोटिशीची होळी करण्यात आली.

विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही होणाऱ्या चौकशीवर टीका केली आहे. कार्यकर्त्यांचा राग अनावर झाल्यास पोलीस जबाबदार असतील, असा इशारा दिला. सुधीर मुनगंटीवार यांनीही चौकशीवरून ठाकरे सरकारवर टीका केली. सत्तेचा गैरवापर होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

मला विशेषाधिकार : देवेंद्र फडणवीस

आपण विरोधी पक्षनेते आहोत. त्यामुळे कोणत्याही प्रकरणाची माहिती घेण्याचा आपल्याला अधिकार आहे. हा माझा विशेषाधिकार आहे. माझ्या माहितीचा स्रोत मला विचारला जाऊ शकत नाही. तरीदेखील आपण चौकशीला सामोरे जाणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. त्यासाठी सर्व कार्यक्रम रद्द करून घरीच थांबणार असल्याचे त्यांनी सांगितले.

संजय राऊतांचा खोचक टोला

राज्यभर या देवेंद्र फडणवीस यांच्या चौकशीविरोधात भाजपकडून निदर्शने करण्यात येत आहेत. दरम्यान, या निदर्शनांवर संजय राऊत यांनी टोला लगावला आहे. त्यांनी ट्विट करून म्हटले आहे की, कमाल आहे ! काही लोक व काही राजकीय पक्ष स्वता:ला कायद्यापेक्षा मोठे का समजत आहेत? महाराष्ट्रात अनेक मंत्री आणि लोकप्रतिनधींनीना राजकीय सुडा पोटी केंद्रीय तपास यंत्रणांनी चौकशीला बोलावले व ते हजर झाले.. लोकशाहीत विशेष अधिकार कोणालाच नसतो. कायद्यापुढे सगळे समान आहेत. मग हा तमाशा का?

दुसरीकडे फडणवीस यांनी आपण रविवारी सकाळी 11 वाजता सायबर सेलच्या कार्यालयात हजर होणार असल्याचे जाहीर केले होते. तसे झाले असते, तर या कार्यालयाच्या बाहेर शक्तिप्रदर्शन करण्याची पूर्ण तयारी भाजपने केली होती. तो धोका लक्षात घेऊन गुन्हे विभागाचे सहपोलिस आयुक्त नितीन जाधव यांनी स्वत: फडणवीस यांना फोन केला आणि तुम्ही सायबर सेलमध्ये येण्याची गरज नाही. आम्हीच आपल्या निवासस्थानी चौकशीसाठी येत असल्याचे कळवले. फडणवीस यांनीही पोलिस ठाण्याला जाण्याचा निर्णय रद्द केला.

हे ही वाचलं का ?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT