मुंबई ; पुढारी ऑनलाईन : राज्य सरकार दाऊदशी व्यवहार करणाऱ्यांना पाठीशी घालत आहे. राज्यातील कोणतीच यंत्रणा सक्षमपणे राबवली जात नाही. भ्रष्टाचार शिगेला पोहोचला आहे. संजय राठोड यांचा राजीनामा लगेच मंजूर होतो; पण दाऊदशी व्यवहार करणाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या सरकारला आम्ही अर्थसंकल्पीय अधिवेशनात जाब विचारणार आहोत, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. (devendra fadanvis)
या वेळी फडणवीस म्हणाले, "राज्यातील सरकारमध्ये अजित पवार यांच्या शब्दाला कोणतीही किंमत राहिलेली नाही. सगळा कारभार अनागोंदी सुरू आहे. शेतकरी हवालदील असताना त्यांच्या प्रश्नावर सरकारचे लक्ष नाही. राज्यात विजेचे संकट जोरात सुरू आहे.
शेतकऱ्यांचे विज बिलासाठी शेतीचे कनेक्शन कट करण्यात येत आहेत. यामुळे पिके वाळून, जळून जात आहेत. शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. राज्यात ज्यांच्या जिवावर निवडून येतो त्या शेतकर्यांची या सरकारला अजिबात चिंता नाही. याबाबत आम्ही अधिवेशनात जोरदार आवाज उठवणार आहाेत, असेही ते म्हणाले.
राज्यातील उस उत्पादक शेतकरी अडचणीत आहे. मागच्या तीन वर्षांत शेतकऱ्यांवर अस्मानी संकट आल्याने तो नुकसानीच्या खाईत असताना शेतकऱ्यांची शेतीची वीज तोडली जात आहे. विजेची बिले जादा दराने आकारली गेल्याने त्या त्रुटी दुर करण्याआधीच कनेक्शन तोडले जात आहे. शेतकऱ्यांची सरकारला कोणतीही कळवळा उरली नाही.
मराठा आरक्षणाबाबत राज्याच्या एका राजेंना उपोषणाला बसावे लागते ही बाब दुर्देवी आहे. राज्यातील भ्रष्टाचार शिगेला पोहेचला आहे. कोणत्याही यंत्रणेवर या सरकारचे नियंत्रण राहिले नाही. या सरकारला दारू उत्पादनावर लक्ष आहे; पण शेतकरी, शेतमजूर यांच्या विषयाची कोणताही निर्णय घेतलेला नाही. हे सरकार शेतकरी रोधी आहे. या सरकारमध्ये दाऊद आणि गुंडांची सहानभुती असलेल्या लोकांना पाठीशी घातले जाते. यामुळे आम्ही सरकारच्या चहापानाला आम्ही जाण्याचा प्रश्नच येत नाही, असेही यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
हेही वाचलं का?