Latest

Demat Account : ‘हे’ काम ३० सप्टेंबरपर्यंत करा, अन्यथा तुमचे डिमॅट खाते होईल बंद  

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन : नॅशनल स्टॉक एक्सचेंजने (NSE) जूनमध्ये जारी केलेल्या परिपत्रकानुसार डिमॅट खातेधारकांना त्यांचे खाते सुरू ठेवण्यासाठी टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन सुरु करावे लागणार आहे. वेळेवर टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन सुरु न केल्यास डिमॅट खात्यात लॉग इन करता येणार नाही. जर वेळेत टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन सुरु केले नाही तर १ ऑक्टोबर २०२२ पासून तुम्ही तुमच्या डिमॅट अकाउंटवर लॉग-इन करु शकणार नाही.

एनएसई ने 14 जून रोजी एक परिपत्रक जारी केले होते. या परिपत्रकात म्हटले होते की, डिमॅट होल्डर्संना नॉलेज अथवा पॉजेशन फॅक्टर आणि बायोमेट्रिक ऑथेंटिकेशनचा वापर करुन टू- फॅक्टर ऑथेंटिकेशन सुरु करायला हवे.

(Demat Account) टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन म्हणजे काय?

टू-फॅक्टर ऑथेंटिकेशनपैकी, नॉलेज फॅक्टर ऑथेंटिकेशन म्हणजे कीवर्ड, पासवर्ड किंवा पिन तयार करणे. ज्याची माहिती फक्त यूजर्सकडे असेल. तर ऑथेंटिकेशन फॅक्टरच्या माध्यमातून बायोमेट्रिक ऑथेंटिकेशनचा वापर करायला हवा. यात फिंगर प्रिंट अथवा चेहऱ्याचा स्कॅन असेल.

जाणून घ्या एनएसआयची मार्गदर्शक तत्त्वे

एनएसईने जूनमध्ये जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की, डिमॅट खाते यूजर्संना बायोमेट्रिक ऑथेंटिकेशनसाठी नॉलेज फॅक्टरसह ऑथेंटिकेशन फॅक्टरमधील एकाचा वापर करावा लागेल. तसेच जिथे बायोमेट्रिक प्रमाणीकरण शक्य नाही अशावेळी यूजर्संना टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन वापरावे लागेल. ब्रोकरेज हाऊस जिरोधानेही आपल्या वेबसाइटवर ही माहिती शेअर केली आहे. ज्यामध्ये यूजर्संना 30 सप्टेंबरपर्यंत टू-फॅक्टर ऑथेंटिकेशनबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT