Delta Air Lines 
Latest

Delta Air Lines : विमानातील मद्यधुंद प्रवाशाकडून मायलेकीचा विनयभंग, ‘डेल्टा एअरलाईन्स’ विरुद्ध खटला

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन: डेल्टा एअरलाईन्समधून प्रवास करणाऱ्या मद्यधुंद प्रवाशाने एक महिला आणि तिच्‍या अल्‍पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याची घटना घडली. विमानातील नऊ तासांच्या प्रवासात न्यूयॉर्कच्या ईस्टर्न डिस्ट्रिक्टमध्ये (Delta Air Lines) हा संतापजनक प्रकार घडला.  फॉक्स बिझनेसने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, विमानात प्रवासादरम्यान झालेल्या या प्रकारानंतर डेल्टा एअर लाईन्सवर गंभीर निष्काळजीपणाचा आरोप करत,  विमान कंपनीविराेधात  २० लाख डॉलर  ( सुमारे एक काेटी, ६४ लाख रुपये ) नुकसान भरपाईसाठी  खटला दाखल करण्यात आला आहे.

डेल्टा एअरलाईनच्या कर्मचाऱ्यांनी विमान प्रवासादरम्यान मद्यधुंद प्रवाशावर कोणतीही कायदेशीर कारवाई केली नाही. स्थानिक अधिकाऱ्यांना या संबंधी कोणतीच कल्पना न देताच या मद्यधुंद आरोपी प्रवाशाला विमानातून बाहेर पडण्याची (Delta Air Lines) परवानगी दिली.

न्यूयॉर्कमधील JFK विमानतळावरून ग्रीसमधील अथेन्स शहरापर्यंतचा प्रवास नऊ तासांचा होता.विमान प्रवासात कर्मचाऱ्यांकडून पीडत महिला आणि तिच्या मुलीच्या मदतीसाठी केलेल्या विनंतीकडे दुर्लक्ष करण्यात आले. प्रवासी भांडखोर असूनही  डेल्टा एअरलाईनच्या कर्मचाऱ्यांनी त्‍याला एकामागोमाग एक तब्‍बल ११ पेग दिले.

विमान प्रवासादरम्यान मद्यधूंद अवस्‍थेतील प्रवाशाने पीडित महिलेसह तिच्‍या अल्‍पवयीन मुलीकडे पाहून "अश्लील हावभाव" केले. यानंतर त्याने तिचा पत्ता विचारला, तिच्या बद्दल इतर माहिती जाणून घेण्याची मागणी केली.  या व्यक्तीने महिलेच्या पाठीवर हात ठेवून तिला घाबरवले. मुलीच्या आईने हस्तक्षेप करून आपली मुलगी अल्पवयीन असल्याचे त्या व्यक्तीला सांगितले. यानंतर मद्यपीने  पीडित महिलेचा हात खेचला, असे देखील करण्यात आलेल्या दाव्यात म्हटले आहे.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT