पुढारी ऑनलाइन डेस्क : Delivery on Road : एका महिलेची रात्रीच्या वेळी चक्क रस्त्यावरच टॉर्चच्या उजेडात प्रसूती करावी लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना मध्यप्रदेशच्या पन्ना जिल्ह्यातील बनौली गावातील आहे. प्रसूती झाल्यानंतर महिला आणि मूल स्वस्थ आणि सुरक्षित आहेत. ही घटना शुक्रवारी (दि.28) रात्रीची आहे.
Delivery on Road : ही सविस्तर घटना अशी आहे की पन्ना जिल्ल्ह्यातील रेश्मा असे या महिलेचे नाव आहे. रेश्माला शुक्रवारी रात्री प्रसव कळा सुरू झाल्या. प्रसव पीडा सुरू झाल्याने तिच्या नातेवाईकांनी 108 नंबर वर कॉल करून इमरजन्सी अॅम्ब्यूलन्स बोलावली. माहिती मिळताच अॅम्ब्यूलन्स महिलेले घेण्यासाठी निघाली सुद्धा. अॅम्ब्यूलन्स या महिलेच्या घरी पोहोचली. महिलेसह तिचे काही नातेवाईक अॅम्ब्यूलन्समध्ये बसून स्वास्थ केंद्राकडे रवाना झाले. महिलेला जवळच्या शाहनगर स्वास्थ्य केंद्रात घेऊन जायचे होते.
Delivery on Road : बनौली हे पन्ना जिल्ह्यातील खूपच लहानसे गाव आहे. त्यामुळे संध्याकाळी लवकर सामसूम होऊन रहदारी कमी होते. रेश्माला नेत असताना अॅम्ब्यूलन्सचे डिझेल संपले. जवळपास कोणतेही पेट्रोलपम्प उपलब्ध नव्हते. तसेच डिझेल घेऊन येण्यासाठी अन्य वाहन उपलब्ध नव्हते. दुसरीकडे रेश्माला प्रसव कळा मोठ्या प्रमाणात सुरू झाल्या. त्यामुळे नातेवाइकांनी रस्त्यावरच प्रसूती करण्याचा निर्णय घेतला. टॉर्चच्या उजेडात तिथेच महिलेचे प्रसूती करावी लागली.
Delivery on Road : या घटनेमुळे मध्यप्रदेशच्या स्वास्थ सुविधांची अवस्थेचा दर्जा किती खाली घसरला आहे, हे समोर आले आहे. तसेच ही घटना नवीन नाही. अॅम्ब्यूलन्स वेळेवर न मिळणे. किंवा अॅम्ब्यूलन्समुळे रुग्णालयात पोहोचता न येणे अशा घटना वारंवार समोर आल्या आहेत. यापूर्वी देखिल अॅम्ब्यूलन्स न मिळाल्यामुळे एका मुलाला आपल्या वडिलांना हातगाडीवरून 5 किलोमीटर चालत दवाखान्यात पोहोचावे लागले होते.
Delivery on Road : दरम्यान रेश्मा आणि तिचे मूल दोन्हीही स्वस्थ आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
हे ही वाचा :