Delhi 
Latest

Delhi : बंदुकीचा धाक दाखवत चोरट्यांनी व्यवसायिकाला लुटले

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क: दिल्लीतील प्रगती मैदान बोगदा संपताच दुचाकीवरून आलेल्या ४ चोरट्यांनी एका व्यवसायिकाला लुटल्याची घटना घडली. ही घटना शनिवारी (दि.२४ जून) घडली असून या प्रकरणाचा व्हिडिओ सीसीटीव्हीमध्ये कॅप्चर झाला आहे, ही माहिती दिल्ली पोलिसांनी दिल्याचे वृत्त एएनआयकडून देण्यात आले आहे.

दिल्लीतील इंडिया गेट ते रिंगरोडला जोडणाऱ्या प्रगती मैदान बोगद्यात ही घटना घडल्याचे समोर आले आहे. व्यवसायिकाला गाडी बोगद्यातून बाहेर पडताच दोन बाईकवरून आलेल्या चार चोरट्यांनी गाडीचा दरवाजा उघडला आणि व्यावसायिकाला बंदुकीचा धाक दाखवत, दोन लाख रूपये लुटले. या घटनेसंदर्भात नवी दिल्ली जिल्ह्यातील टिळक मार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चोरट्यांचा शोध सुरू असल्याची माहिती दिल्ली पोलिसांकडून देण्यात आली आहे.

याविषयी अधिक माहिती सांगता नवी दिल्ली जिल्ह्याचे पोलिस उपायुक्त प्रवण तायल म्हणाले पटेल साजन कुमार चांदनी चौकातील ओमिया एंटरप्रायझेसमध्ये डिलिव्हरी एजंट म्हणून काम करतात. ते त्याचा मित्र जिगर पटेल याच्यासोबत शनिवारी संध्याकाळी दोन लाख रुपये देण्यासाठी गुरुग्रामला जात होते.

दरम्यान रिंगरोडवरून प्रगती मैदान बोगद्यात प्रवेश करून काही अंतरावर गेल्यावर दोन दुचाकींवर आलेल्या चार चोरट्यांनी शस्त्राच्या जोरावर फोरव्हिलर जबरदस्तीने अडवली. गाडीचा दरवाजा उघडत,त्यातील २ लाख रूपये असलेली बॅग चोरांनी घेतली आणि त्याठिकाणाहून पळ काढला. यानंतर पटेल साजन कुमार यांच्या तक्रारीवरून टिळक मार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT