Delhi Police Crime Branch 
Latest

Delhi Police Crime Branch: मुख्यमंत्री केजरीवाल यांच्यानंतर ‘मंत्री अतिशीं’च्या घरी दिल्ली पोलीस

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क: दिल्लीचे मुख्यमंत्रीअरविंद केजरीवाल यांच्यानंतर, आज (दि.४) मंत्री अतिशी मार्लेना यांच्या घरी दिल्ली पोलीस पोहचले आहेत. आम आदमी पक्षाने भाजपवर आमदार विकत घेतल्याचा आरोप केल्यानंतर दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि आप मंत्री अतिशी यांना नोटीस दिल्या आहेत. यापूर्वी काल दिल्ली पोलिस मुख्यमंत्री केजरीवाल यांना देखील नोटीस देण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी दुसऱ्यांदा पोहचले होते. (Delhi Police Crime Branch)

दिल्ली पोलिसांची गुन्हे शाखेची टीम रविवारी (दि.४) दिल्ली मंत्री आतिशी यांच्या घरी पोहोचली आहे. परंतु मीडिया रिपोर्ट्सनुसार, दिल्ली गुन्हे शाखा टीम जेव्हा मंत्री अतिशी यांच्या घरी पोहोचली तेव्हा आतिशी घरी नव्हत्या. पोलिस जेव्हा अतिशी यांच्या घरी पोहचले तेव्हाची आतिशी यांच्या घराबाहेरील स्थितीचा व्हिडिओद्वारे एएनआयने शेअर केली आहेत. (Delhi Police Crime Branch)

केजरीवालांचा 'भाजप'वर काय आरोप?

आपच्या दिल्लीतील ७ आमदारांना भाजपने संपर्क साधला आहे. त्यांना भाजपमध्ये येण्यासाठी प्रत्येकी २५ कोटी रूपयांची ऑफर दिली आहे, असा गंभीर आरोप आम आदमी पक्षाचे निमंत्रक आणि  दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. या संदर्भातील एक्स पोस्ट केजरीवाल यांनी त्यांच्या अधिकृत X अकाऊंटवरून केली होती. ( Delhi Police Crime Branch)

भाजपने अशी ऑफर दिल्याचे केजरीवालांचा आरोप

मुख्यमंत्री केजरीवाल यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, अलीकडेच त्यांनी आमच्या दिल्लीतील ७ आमदारांशी संपर्क साधला आहे. या वेळी सांगितले की, "आम्ही केजरीवाल यांना काही दिवसांनी अटक करू. त्यानंतर आमदार फोडू. आपमधील २१ आमदारांशी आमची चर्चा झाली आहे. इतरांशीही बोलणे सुरू आहे. त्यानंतर दिल्लीतील आम आदमी पक्षाचे सरकार पाडू. तुम्ही पण येऊ शकता. २५ कोटी रूपये देणार यासाठी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवावी लागेल, अशी भाजपने ऑफर दिल्याचा गंभीर आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर केला आहे.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT