Delhi excise policy case 
Latest

Delhi excise policy case: केजरीवालांचा आणखी एक मंत्री अडचणीत; कैलाश गेहलोत यांना ED कडून समन्स

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीतील अनेक मंत्री आणि नेते अडचणीत सापडले आहेत. दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणी ईडीकडून आपच्या अनेक नेत्यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. दरम्यान दिल्लीचे मुख्यमंत्री आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्यावर कारवाई करत ईडीने त्यांना अटक केली. दरम्यान दिल्ली राऊस अव्हेन्यू न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यानंतर आता आपचे मंत्री कैलाश गहलोत यांना देखील ईडीने समन्स बजावले असून, अरविंद केजरीवाल यांचा आणखी एक मंत्री अडचणीत सापडला आहे. या संदर्भातील वृत्त एएनआयने दिले आहे. (Delhi excise policy case)

दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणी ईडीने दिल्ली सरकारचे परिवहन मंत्री कैलाश गेहलोत यांना चौकशीसाठी समन्स बजावले. कैलाश गेहलोत सध्या दिल्ली सरकारमध्ये परिवहन मंत्री आहेत. या प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह अनेक आप नेत्यांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. (Delhi excise policy case)

अलीकडेच दिल्लीचे परिवहन मंत्री कैलाश गेहलोत यांनी 'इंडिया विथ केजरीवाल' या टॅगलाइनसह केजरीवाल यांचे पोस्टर शेअर केले होते. त्यांनी लिहिले, "संपूर्ण देश दिल्लीच्या सुपुत्राच्या पाठीशी उभा आहे. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत केजरीवाल यांच्या समर्थनार्थ आवाज उठवला जात आहे. देशाचे राजकारण बदलणाऱ्या कट्टर देशभक्ताला देशातील जनता एकटी सोडणार नाही. "

आपचे राष्ट्रीय संयोजक दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ED ने 21 मार्च रोजी दिल्ली उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली. त्यानंतर सोमवार 1 एप्रिलपर्यंत केंद्रीय तपास संस्थेच्या शिफारशीनुसार त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. दिल्ली अबकारी धोरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक झाल्यानंतर दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया देखील सध्या दिल्लीच्या तिहार तुरुंगात आहेत.

हे ही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT