Latest

Rajnath Singh meets UK PM Rishi Sunak | भारत- ब्रिटन संबंध अधिक मजबूत, राजनाथ सिंह यांनी घेतली ऋषी सुनक यांची भेट

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन : भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बुधवारी १० डाउनिंग स्ट्रीट येथे ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची भेट घेतली आणि द्विपक्षीय मुद्द्यांवर विस्तृत चर्चा केली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मते, संरक्षण, व्यापार आणि प्रादेशिक मुद्दे चर्चेच्या अजेंड्यावर होते. सध्या चालू असलेल्या मुक्त व्यापार कराराच्या (FTA) वाटाघाटींवरदेखील द्विपक्षीय चर्चा करण्यात आली. संरक्षणमंत्र्यांच्या या दौऱ्यादरम्यान ब्रिटन आणि भारत द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्यावर भर राहिला. (Rajnath Singh meets UK PM Rishi Sunak)

आम्ही संरक्षण, आर्थिक सहकार्य तसेच भारत आणि ब्रिटन शांततापूर्ण आणि स्थिर जागतिक नियम-आधारित व्यवस्था मजबूत करण्यासाठी एकत्र कसे कार्य करू शकतात या मुद्द्यांवर चर्चा केली, अशी माहिती राजनाथ सिंह यांनी X वर पोस्ट करत दिली आहे.

राजनाथ सिंह म्हणाले की, २०२० मध्ये भारत आणि चीन आमने-सामने आले आणि आमच्या सुरक्षा दलांनी दाखवलेले शौर्य हेच कदाचित चीनचा भारताबाबतचा दृष्टिकोन बदलण्यास कारण ठरले. भारत आता कमजोर राहिलेला नाही, याची जाणीव त्यांना झाली आहे. "पूर्वी आम्ही संरक्षण सामग्रीचे सर्वात मोठे आयातदार होतो, परंतु आता संरक्षण सामग्रीच्या निर्यातीच्या बाबतीत आम्ही पहिल्या २५ देशांमध्ये आहोत."

ब्रिटनचे पंतप्रधान सुनक यांनी राजनाथ सिंह यांच्याशी ब्रिटन आणि भारताने व्यापार, संरक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्रात काम करण्याबाबत सहमती दर्शवली. विशेषतः त्यांनी सध्या सुरू असलेल्या मुक्त व्यापार करार (FTA) वाटाघाटी लवकरच यशस्वी निष्कर्षापर्यंत पोहोचतील, अशी आशा व्यक्त केली.

या द्विपक्षीय बैठकीदरम्यान संरक्षणमंत्र्यांनी ब्रिटनच्या पंतप्रधानांना राम दरबार पुतळा भेट दिला. यावेळी ब्रिटनचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सर टिम बॅरो उपस्थित होते, अशी माहिती संरक्षण मंत्रालयाने दिली.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह सध्या ग्रेट ब्रिटनच्या अधिकृत दौऱ्यावर आहेत. २० हून अधिक वर्षांनी झालेला भारतीय संरक्षण मंत्र्यांचा ब्रिटनचा हा पहिला दौरा आहे. या आधीच्या दिवशी राजनाथ सिंह आणि ग्रँट शॅप्स लंडनमधील ट्रिनिटी हाऊस येथे भारत-ब्रिटन संरक्षण उद्योग सीईओंच्या बैठकीला हजर राहिले होते.

२०२५ मध्ये कॅरियर स्ट्राइक ग्रुपने भारतीय जलक्षेत्राला भेट देण्याच्या प्रस्तावासह ब्रिटनने या वर्षाच्या अखेरीस आपला लिटोरल रिस्पॉन्स ग्रुप हिंद महासागर प्रदेशात पाठविण्याची योजना जाहीर केली. दोघेही भारतीय सैन्यासोबत प्रशिक्षण घेतील. (Rajnath Singh meets UK PM Rishi Sunak) यासाठी ब्रिटन सरकार या वर्षाच्या अखेरीस रॉयल नेव्ही युद्धनौका भारतीय सैन्यासह ऑपरेशन्स आणि प्रशिक्षणासाठी हिंदी महासागर प्रदेशात पाठवणार आहे.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT