France New PM Gabriel Attal : ‘गॅब्रिएल अटल’ फ्रान्सचे सर्वात तरुण पंतप्रधान; राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांची घोषणा | पुढारी

France New PM Gabriel Attal : 'गॅब्रिएल अटल' फ्रान्सचे सर्वात तरुण पंतप्रधान; राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांची घोषणा

पुढारी ऑनलाईन डेस्क : फ्रान्सच्या इतिहासात पहिल्यांदाच समलैंगिक व्यक्तीला पंतप्रधान बनवण्यात आल्याची मोठी बातमी आहे. गॅब्रिएल अटल असे त्यांचे नाव आहे. गॅब्रिएल हे फ्रान्सचे शिक्षणमंत्री होते. आता ते पहिले समलैंगिक पंतप्रधान आणि फ्रान्सचे सर्वात तरुण पंतप्रधान देखील बनले आहेत. गॅब्रिएल यांचं वय 34 वर्ष आहे. माजी पंतप्रधान एलिझाबेथ बॉर्न यांच्या राजीनाम्यानंतर त्यांनी हे पद स्वीकारले. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी गॅब्रिएल यांची पंतप्रधानपदी निवड केली आहे. France first Gay and Youngest PM Gabriel Attal

फ्रान्सचे नवे पंतप्रधान गॅब्रिएल अटल यांच्याबाबत माहिती | France first Gay and Youngest PM Gabriel Attal

फ्रान्सच्या स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, नवे पंतप्रधान गॅब्रिएल अटल हे इमॅन्युएल मॅक्रॉन यांचे जवळचे सहकारी आहेत. कोरोना महामारीच्या काळात ते सरकारचे प्रवक्ते होते. नुकत्याच झालेल्या ओपिनियन पोलमध्ये गॅब्रिएल हे देशातील सर्वात लोकप्रिय नेता म्हणून समोर आले आहेत. गॅब्रिएल यांना सभागृहात बोलका नेता म्हणून ओळखले जाते. गॅब्रिएल यांचा जन्म मार्च 1989 मध्ये झाला. पंतप्रधान होण्यापूर्वी ते शिक्षण आणि युवा व्यवहार मंत्री होते. फ्रान्सच्या नवीन पंतप्रधानांचे वडील ज्यू वंशाचे असून त्यांची आई ग्रीक-रशियन असल्याचे सांगितले जाते. (France first Gay and Youngest PM Gabriel Attal)

पंतप्रधान एलिझाबेथ बोर्न यांच्या राजीनाम्यानंतर एटेल यांची नियुक्ती

पंतप्रधान एलिझाबेथ बोर्न (PM Elisabeth Borne) यांनी सोमवारी (8th January 2024) आपल्या पदाचा राजीनामा दिला. इमिग्रेशनच्या मुद्द्यावरून वाढत्या राजकीय तणावामुळे एलिझाबेथ यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिल्याची चर्चा आहे. राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर फ्रान्सच्या नव्या पंतप्रधानपदी कोण विराजमान होणार याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं राहिले होते. आज या पदासाठी नवीन घोषणा झाल्यानंतर या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.

हेही वाचा

 

Back to top button