deepika padukone 
Latest

Deepika Padukone: ऑस्करसाठी रवाना झाली दीपिका, लूक व्हायरल

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) यंदाच्या ९५व्या अकादमी पुरस्कार सोहळ्यात सेलिब्रिटी प्रेझेंटरचा एक भाग असणार आहे. दीपिका ऑस्करच्या सेलिब्रिटी प्रेझेंटर्समध्ये सहभागी होण्यासाठी रवाना झाली. अत्यंत प्रतिष्ठेच्या या पुरस्कार सोहळ्यात दीपिका सहभागी होणार असून भारताकडून ती प्रेझेंटर म्हणून देशाचा गौरव करताना दिसणार आहे. ऑस्करमध्ये सहभागी होण्यासाठी ती अमेरिकेला गेली आहे. ती मुंबईहून एअरपोर्टवर बॉसी लूकमध्ये दिसली. (Deepika Padukone)

दीपिका पदुकोणला विमानतळावर पोहोचण्यासाठी सोबत तिचा पती आणि अभिनेता रणवीर सिंह आला होता. बॉसी लूकमध्ये दीपिका सुंदर दिसत होती. तिने लॉन्ग ब्लॅक ब्लेझर परिधान केला होता. निळ्या फ्लेर्ड डेनिम ट्राउझर्स, हाय हिल्स बूट, ओपन हेअर स्टाईल आणि डोळ्यांवर चष्मा असा तिचा लूक लक्षवेधी ठरला.

विरल भयाणी यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर दीपिकाचा व्हिडिओ पाहता येतो. दीपिका पदुकोणच्या या व्हिडिओवर युजर्सनी कमेंट्स केले आहेत. अभिनेत्री दीपिकाच्या लूक आणि स्टाईलचे ते कौतुक करत आहेत. एका यूजरने लिहिले, 'उत्कृष्ट व्यक्तिमत्त्व. तिच्यासारखे काम कोणी करत नाही. आणखी एका युजरने लिहिले की, 'दीपिका ऑस्करसाठी निघत आहे. ही मोठी संधी आहे. एका युजरने लिहिले की, 'दीपिका आम्हाला तुझा अभिमान आहे.'

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT