Latest

Cannes : डीप नेक रेड कलर गाऊनमध्ये भाव खाऊन गेली दीपिका (video)

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : कान्स फिल्म फेस्टिव्हल ( Cannes) या वर्षातील सर्वात मोठा चित्रपट महोत्सव सुरू झाला आहे. हा असा एक महोत्सव आहे ज्यावर जगभरातील लोकांच्या नजरा खिळल्या आहेत. लोकांमध्ये या उत्सुकतेचे प्रमुख कारण म्हणजे फेस्टिव्हलमध्ये दाखवल्या जाणाऱ्या चित्रपटांसह रेड कार्पेटवर थिरकणाऱ्या सेलिब्रिटींचा लूक. या सेलिब्रिटींमध्ये आपल्या अनेक भारतीय अभिनेत्रींचाही समावेश आहे. कान्सच्या पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी आपल्या सौंदर्याने थक्क करणाऱ्या दीपिका पदुकोण, ऐश्वर्या राय बच्चन, तमन्ना भाटिया, पूजा हेगडे, हिना खान यांनी तिसऱ्या दिवशीही आपली चमक दाखवली. यापैकी एक दीपिका पादुकोनने तर ७५ व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये उत्तम लूक करून सर्वांचेच लक्ष आपल्याकडे वेधून घेतले.

सध्या दीपिका कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये (Cannes)आहे. तिने आपल्या सौंदर्याने सर्वांना घायाऴ केलं आहे. रेड कार्पेटवरून तिचे सगळे लूक समोर येत आहेत. आता दीपिकाने लॉन्ग डीप नेक रेड कलरच्या गाऊनमध्ये लेटेस्ट लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे. स्मोक आईज आणि सिल्व्हर कलरच्या ज्वेलरीमुळे तिचे अप्रतिम सौंदर्य दिसत आहे. तिचा हलका मेकअप घेऊन ती पुन्हा एकदा तिच्या चाहत्यांना वेड लावत आहे.

१७ मेपासून सुरु झालेल्या कान्स फिल्म फेस्टिव्हल दरम्यान दीपिका पदुकोणचे एकामागून एक लूक्स समोर येत आहेत. यातील खास म्हणजे, दीपिकाने शेअर केलेल्या एका व्हिडिओत तिच्या नजाकतीसोबत पाठीमागे सुंदर समुद्र दिसतोय. यावेळी तिने आपल्या कमरेवर हात ठेवत हॉट पोझ दिली आहे. हा व्हिडिओने चाहत्यांना भूरळ घातली आहे.

हे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी भरभरून कॉमेन्टस केल्या आहेत. यात एका युजर्सने 'Queen ????', 'Looking sooo Hottt??you go girl❤??', 'GORGEOUS?❤️', 'Wow ?', 'Queen of Red carpet ?', 'red rose❤️❤️'. यासारख्या अनेक कॉमेन्टस केल्या आहेत. तर काही नेटकऱ्यांनी हार्ट आणि फायरचे ईमोजी शेअर केले आहे.

हेही वाचलंत का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT