'Deccan Odyssey' train 
Latest

‘डेक्कन ओडीसी’ पुन्हा धावणार

दिनेश चोरगे

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : कोव्हिड काळात थांबलेल्या डेक्कन ओडिसी या आलिशान आणि आरामदायी ट्रेनची चाके गुरुवारी पुन्हा एकदा धावली. देशी-परदेशी पाहुण्यांना महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांची सफर घडविणारी डेक्कन ओडिसी ट्रेन नव्या स्वरूपात आल्याने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पर्यटनात वाढ होईल, असा विश्वास पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला. देशातील महत्त्वाच्या शहरांसह ही गाडी कोल्हापुरातही येणार आहे. ('Deccan Odyssey' train)

'Deccan Odyssey' train : पर्यटनात वाढ होईल

पर्यटन मंत्री गिरीश महाजन आणि विधानसभा सभापती अ‍ॅड. राहुल नार्वेकर यांनी गुरुवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील फलाट क्रमांक 18 वर हिरवा झेंडा दाखवत डेक्कन ओडिसीची सेवा पुन्हा एकदा सुरू केली. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची ही डेक्कन ओडिसी ट्रेन सीएसएमटी ते ठाणे व पनवेल ते पुन्हा सीएसएमटी दरम्यान धावली. यावेळी पर्यटन व सांकृतिक कार्य विभागाच्या प्रधान सचिव राधिका रस्तोगी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या महासंचालक जयश्री भोज, एमटीडीसीच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी यांच्यासह भारतीय रेल्वेचे अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT