पुढारी ऑनलाईन डेस्क : आज आयपीएलमध्ये २०२३ च्या हंगामातील ६७ वा सामना खेळवला जात आहे. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स आमने-सामने आहेत. हा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जात आहे. दरम्यान, चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या चेन्नईने डेवॉन कॉनवे आणि ऋतुराज गायकवाडच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर २२३ धावा केल्या असून दिल्लीसमोर २२४ धावांचे आव्हान ठेवले आहे.
चेन्नईकडून ऋतुराज गायकवाड ५० चेंडूमध्ये ७९ धावा, डेवॉन कॉनवे ५२ चेंडूमध्ये ८२ धावा तर शिवम दुबेने ९ चेंडूमध्ये २२ धावांचे योगदान दिले. दिल्लीकडून खलील अहमद, चेतन सकारिया आणि अनरिख नोर्खिया यांनी प्रत्येकी १ विकेट पटकावली. दिल्लीचा पराभव करता आला नाही तर चेन्नईचा प्लेऑफमधून बाहेर पडणार आहे. त्यामुळे दिल्लीला पराभूत करणे चेन्नईसाठी आवश्यक असणार आहे.