पुढारी ऑनलाईन डेस्क : हिंदूत्व आणि मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी, राज्यातील माय-बाप जनतेच्या सुखसमृद्धी आणि भरभराटीसाठी. मा. बाळासाहेबांच्या आशीर्वादानं आपण सगळे जमणार आहोत बीकेसी मैदानावर. सर्वांना विजयादशमीच्या, दसऱ्याच्या (Dasara 2022) हार्दिक शुभेच्छा. असं ट्विट करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेत्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. ट्विटसोबत त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे.
ही वेळ आहे अनेक नव्या संकल्पांसह सीमोल्लंघनाची
आज विजयादशमी, दसरा. यानिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडियावरुन सर्वांना विजयादशमीच्या, दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे, हिंदूत्व आणि मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी, राज्यातील माय-बाप जनतेच्या सुखसमृद्धी आणि भरभराटीसाठी. मा. बाळासाहेबांच्या आशीर्वादानं आपण सगळे जमणार आहोत बीकेसी मैदानावर. सर्वांना विजयादशमीच्या, दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. यावेळी त्यांनी चला_ BKC असा हॅशटॅग दिल्या आहे. या शुभेच्छा संदेशाबरोबरच त्यांनी अवघ्या १६ सेकंदाचा व्हिडिओ शेअर केला आहे.
Dasara 2022 : चला बीकेसी…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शुभेच्छा संदेशाबरोबरच अवघ्या १६ सेकंदाचा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये काही सेंकदानी निर्णय विकासाचा, निर्णय हिंदुत्वाचा, निर्णय मराठीच्या अभिमानाचा, अशी वाक्य येताना दिसत आहेत. त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विविध पोझमधील फोटो पाहायला मिळत आहेत. शेवट मात्र लक्षवेधी आहे. व्हिडिओच्या शेवटी त्यांनी दसरा मेळावा स्वाभिमानाचा… दसरा मेळावा शिवसेनेचा असं लिहीत आजच्या दसऱ्या मेळाव्याची तारीख, ठिकाण आणि वेळ नमूद केली आहे. हा दसरा मेळावा आज ५ ऑक्टोंबर २०२२, सायंकाळी ५ वाजता BKC मैदान, वांद्रे, मुंबई येथे होणार आहे.
पहिल्यांदाचा शिवसेनेचे दोन दसरा मेळावे
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सुरु केलेला शिवसेनेचा दसरा मेळावा ही शिवसेनेची खास परंपरा नेहमीच चर्चेतील विषय आणि कायम लक्षात राहणारा. यावर्षीचा दसरा मेळावा तसा चर्चेतील विषयच राहिला आहे आणि तितकाच तो खास राहणारा आहे. कारण यंदा शिवसेनेचे दोन दसरा मेळावे होणार आहेत. एक होणार आहे तो ठाकरे गटाचा शिवाजी पार्क, मुंबई येथे. तर बीकेसी मैदान, वांद्रे, मुंबई येथे शिंदे गटाच्या शिवसेनेचा दसरा मेळावा होणार आहे.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.
'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.
Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.