पुढारी ऑनलाईन डेस्क : वुमन्स प्रीमिअर लीग २०२३ स्पर्धेला ४ मार्चपासून प्रारंभ होणार आहे. या लीगमध्ये ५ संघ सहभागी होणार आहेत. स्पर्धेचा लिलाव सोमवारी (दि.१३) मुंबई येथे पार पडला. यावेळी देश-विदेशातील महिला क्रिकेटपटूंवर पैशांचा पाऊस पडला. या लिलावात ८७ खेळाडूंवर बोली लागली. मात्र अनेक खेळाडूंना या लीगमध्ये खेळण्याची संधी हुकली. ब्रिटनच्या एका खेळाडूने सोशल मीडियावर निराशा व्यक्त केली आहे. सध्या तिची पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे. (Daniel Watt)
वुमन्स प्रीमिअर लीग २०२३ स्पर्धेच्या पहिल्या लिलावात स्मृती मानधनावर सर्वाधिक बोली लागली. रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरने सर्वाधिक ३ कोटी ४० लाख रुपयांची विक्रमी बोली लावत स्मृतीला आपल्या ताफ्यात सामील केले. मानधनानंतर ऑस्ट्रेलियाची अष्टपैलू खेळाडू ऍशले गार्डनर स्पर्धेची दुसरी सर्वात महागडी खेळाडू ठरली. तिला गुजरात जायंट्सने ३ कोटी २० लाख रुपयांची बोली लावत आपल्या संघात सामील केले. (Daniel Watt)
मात्र या लिलावात अनेक महिला क्रिकेटपटूंना खरेदीदार मिळाला नाही. त्यापैकी एक इंग्लंडची फलंदाज डॅनियल वॅट आहे. या लिलावात एकाही संघाने तिला आपल्या संघात सामील केले नाही. लिलावात खरेदीदार न मिळाल्यामुळे डॅनियल खूपच निराश झाली असून, तिने ट्वीट करत निराशा व्यक्त केली आहे.
ट्वीट करत डॅनियल म्हणाली की, "वुमन्स प्रीमिअर लीगमध्ये खेळण्याची स्वप्न पाहिले होते. मात्र मला यंदा संधी मिळाली नाही. माझ्यासाठी हे वेदनादायी आहे. ज्या खेळाडूंना WPL मध्ये खेळण्याची संधी मिळाली त्या सर्वांचे अभिनंदन. भारत हे क्रिकेट खेळण्यासाठी एक चांगले ठिकाण आहे."
हेही वाचा;