File Photo  
Latest

पालघर : डहाणूत धर्मांतराचा डाव उधळला; चार मिशनरीना अटक

अनुराधा कोरवी

डहाणू (जि. पालघर) : पुढारी वृत्तसेवा : आमचा ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यास तुमचे सर्व दुखणे बंद होईल, असे सांगून पैसे देण्याचे आमिष दाखवत जबरदस्तीने धर्मांतराचा डाव डहाणू स्थानिक ग्रामस्थांनी उधळून लावला. क्लेमेंट डी. बैला, मरीयामा टी. फिलीप्स, परमजीत उर्फ पिंकी शर्मा कौर आणि परशुराम धर्मा धिंगाडा या चार मिशनरीना अटक केली आहे.

डहाणूजवळील सरावली तलावपाडा येथे शुक्रवारी (दि. ५) रोजी दुपारी घरात एकटी असलेल्या वयस्कर आदिवासी महिलेला पैशाचे आमिष दाखवत जबरदस्तीने ख्रिश्चन धर्म स्वीकाण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न करणार्‍या चार मिशनरीना पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली आहे. पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी, जव्हार आणि विक्रमगड या दुर्गम आदीवासी बहुल तालुक्यात धर्मांतर करण्यात येत असून समस्या खूप जूनी आहे.

ख्रिश्चन धर्म स्वीकारण्याची सक्ती केल्याची तक्रार या महिलेने डहाणू पोलिसांत केल्याने महिलेच्या तक्रारीवरून डहाणू पोलिसांनी क्लेमेंट डी. बैला, मरीयामा टी. फिलीप्स, परमजीत उर्फ पिंकी शर्मा कौर आणि परशुराम धर्मा धिंगाडा या चार मिशनरीना ताब्यात घेतले आणि त्याच्यावर भा.दं.वि. कलम १५३, २९५, ४४८, ३४ प्रमाणे गुन्हे दाखल करून अटक केली आहे.

हेही वाचलंत का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT