Latest

Kachhi Dabeli origin : कच्ची दाबेलीतील ‘कच्ची’चा नेमका अर्थ काय?

मोहसीन मुल्ला

पुढारी ऑनलाईन – कच्ची दाबेली तुमच्यातील अनेकांनी खाल्ली असेल. लादी पावमध्ये बटाटा, विविध चटण्या, डाळिंबाच्या बिया, शेव, मसाला शेंगदाणे घालून ताव्या भाजून दिलेली कच्ची दाबेली अनेकांसाठी आवडती डिश आहे. कच्ची दाबेली हा पदार्थ सगळ्याच खाऊगल्ल्यांत मिळतो. बरेच हौशी लोक घरीही बनवतात; पण गंमत अशी आहे की, यात काहीही कच्चे नाही, तरीही याला कच्ची दाबेली का म्हणतात, असा प्रश्न अनेकांना पडत असेल तर याचे उत्तर आहे या पदार्थाचं मूळ स्थान. (Kachhi Dabeli history behind its origin and its journey to maharashtra)

Kachhi Dabeli origin : मुळचा पदार्थ गुजरातमधील कच्छ येथील

कच्ची दाबेली हा पदार्थ मुळचा गुजरातमधील कच्छ येथील. कच्छ या शब्दावरून कच्ची असा शब्द रूढ झाला. दाबेली म्हणजे दाबण्यात आलेली. आणि कच्ची दाबेली या नावाने ही डिश सर्वत्र पोहोचली. कच्ची दाबेली हा बटाटा वड्याचा उपप्रकार असल्याचे अनेकांना वाटते. पण तसे काही नाही. दोन्ही पदार्थ वेगवेगळे आहेत. हा पदार्थ १९६०मध्ये कच्छ प्रांतातील मांडवी येथ सर्वप्रथम बनला. केशवजी मलम नावाच्या एका स्ट्रीटफूड विक्रेत्याने कच्छी दाबेली सर्वांत प्रथम बनवली. त्या वेळी याची किंमत १ आणा होती.

जेव्हा संयुक्त महाराष्ट्र अस्तित्वात आला तेव्हाच्या काळात गुजरातमधून ही डिश मुंबईत आली. आता मुंबईच नाही तर देशातील विविध भागांत ही डिश पोहोचली आहे. कच्ची दाबेली मध्ये आता चीज दाबेली, माटुंगा दाबेली, ड्राय फ्रुटस दाबेली अशा विविध रूपांत ही डिश बनते.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT