Cyclone Michaung 
Latest

Cyclone Michaung :’मिचौंग’ चक्रीवादळ आंध्रप्रदेशच्या किनारपट्टीला धडकण्यास सुरूवात

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क : बंगालच्या उपसागरात तयार झालेले चक्रीवादळ 'मिचौंग' हे आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर बापतलाजवळ धडकण्यास सुरूवात झाली असून, पुढील दोन तास लँडफटलिंगची प्रक्रीया सुरूच राहणार आहे, अशी माहिती हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय मोहापात्रा यांनी दिली आहे. (Cyclone Michaung)

'मिचौंग' चक्रीवादळ गेल्या ६ तासांपासून १० किमी प्रतितास वेगाने उत्तरेकडे सरकत आहे. आज ५ डिसेंबर रोजी दुपारी १.३० वाजता ते आंध्र प्रदेश किनारपट्टीच्या केंद्रस्थानी आहे. तसेच ते सध्या दक्षिण आंध्र प्रदेश किनारपट्टीवर केंद्रित झाले असून, आंध्रच्या किनारपट्टीला धडकण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पुढील दोन तासांत आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीलगत वाऱ्याचा वेग वाढण्याची शक्यता आहे.  दरम्यान, प्रतितास ९० ते १०० किमी प्रतितास वाऱ्याचा वेग राहणार असून, या भागात मुसळधार पाऊस सुरू आहे, असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. Cyclone Michaung)

'मिचौंग' चक्रीवादळाचा 'या' राज्यांना फटका

'मिचौंग' चक्रीवादळाचा तमिळनाडू, पद्दुच्चेरी आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीला फटका बसला आहे. याचा प्रभावाखाली आलेल्या चेन्नईला गेल्या दोन दिवसांपासून पावसाने झोडपले आहे. तसेच 'मिचौंग' चक्रीवादळ आंध्रप्रदेश किनारपट्टीला धडकण्यापूर्वी ते अतिशय तीव्र होत आहे. दरम्यान विस्कळीत हवामान प्रणालीमुळे तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशात मुसळधार पाऊस सुरू असून, अनेक भागांत पाणी साचून, पूरस्थितीची शक्यता आहे. त्यामुळे पाणी साचलेल्या भागात बचावकार्य राबवले जात असून, नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात येत आहे, असेही माध्यमांनी स्पष्ट केले आहे. (Cyclone Michaung)

आंध्र प्रदेश किनापट्टीजवळील हजारो लोकांचे स्थलांतर

सध्या तीव्र रूप धारण केलेले मिचौंग चक्रीवादळ पुढील चार तासांत दक्षिण आंध्र प्रदेशची किनारपट्टी बापतला जवळ येण्याची शक्यता आहे. सध्या नेल्लोर आणि मछलीपट्टनम दरम्यान आंध्र प्रदेशच्या दक्षिणेकडील किनारपट्टीवर मिचौंग चक्रीवादळ आल्याने एनडीआरएफचे पथक बापतला समुद्रकिनाऱ्यावर तैनात करण्यात आले आहे. तसेच सुरक्षेच्या कारणास्तव सुमारे ९४५० लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT