Latest

सीएसकेची रिटेन पॉलिसी आली समोर; तीन भारतीय खेळाडू रिटेन करण्याची शक्यता

backup backup

आयपीएल २०२२ च्या हंगामासाठी सीएसकेची रिटेन पॉलिसी समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सीएसके येणाऱ्या तीन हंगामासाठी तीन भारतीय खेळाडूंना रिटेन करणार आहे. यात अर्थातच महेंद्रसिंह धोनीचा पहिल्यांदा समावेश असेल. याचबरोबर सीएसके रविंद्र जडेजा आणि ऋतुराज गायकवाड यांनाही रिटेन करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे. २०२१ च्या आयपीएल हंगामात सीएसकेचा सलामीवीर ऋतुराज गायकवाडने दमदार कामगिरी केली होती.

बीसीसीआयच्या नव्या रिटेन पॉलिसीनुसार एक संघ केवळ चार खेळाडूंना रिटेन करु शकतो. या नियमानुसार सीएसकेची रिटेन पॉलिसी कशी असेल याची माहिती सूत्रांच्या हाती लागली आहे. या माहितीनुसार सीएसकेने आपले तीन खेळाडू रिटेन केले आहे. तर चौथ्या खेळाडूसाठी इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू मोईन खान सोबत चर्चा सुरु आहे. जर मोईन अलीने खेळण्यास नकार दिला तर सीएसके सॅम करनला रिटेन करण्यासाठी तयार आहे. इतिहासात पहिल्यांदाच सीएसकेने सुरेश रैनाला रिटेन केलेले नाही.

सीएसकेची रिटेन पॉलिसी : धोनीची तगडी ब्रँड व्हॅल्यू

चेन्नईला हे चांगले माहित आहे की धोनी खेळाडू बरोबरच ब्रँड व्हॅल्यूच्या बाबत तगडा आहे. त्यामुळेच धोनीला रिटेन करण्यावरुन कोणतेही मतभेद नसणार. याचबरोबर खुद्द धोनीनेच आपण आपला शेवटचा आयपीएल सामना चेन्नईत खेळणार असल्याचे जाहीर केले आहे.

बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी यापूर्वी सांगितल्याप्रमाणे आयपीएलच्या पुढच्या हंगामात ८ संघांएवजी १० संघ असणार आहेत. याचबरोबर संघांना आपल्या रिटेन करणाऱ्या खेळाडूंची यादी ३० नोव्हेंबर पर्यंत बीसीसीआयकडे जमा करायची आहे. यानंतर डिसेंबरमध्ये आयपीएलचे मेगा ऑक्शन होणार असल्याची चर्चा आहे.

दिल्लीही ऋषभ पंतलाच ठेवणार कायम

दिल्लीनेही आयपीएल २०२२ च्या हंगामासाठी आपली रिटेन पॉलिसी ठरवण्यास सुरुवात केली आहे. दिल्लीने संघाचे कर्णधारपद ऋषभ पंतकडेच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याचबरोबर दिल्ली पृथ्वी शॉ आणि नॉर्खिया यांना रिटेन करण्याची शक्याता आहे. श्रेयस अय्यरला दिल्लीचे कर्णधारपद हवे होते. मात्र संघ व्यवस्थापनाने ऋषभ पंतकडेच कर्णधारपद देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे श्रेयस अय्यरही आता मेगा ऑक्शनमध्ये उपलब्ध असण्याची शक्यता आहे.

मुंबई इंडियन्सने देखील आतापर्यंत फक्त रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराहवर आपला निर्णय घेतला आहे. संघ व्यवस्थापनाची पोलार्ड बरोबर बोलणी सुरु आहेत. याचबरोबर आयपीएलमधील दोन नव्या संघांनी देखील खेळाडूंना संपर्क करण्यास सुरुवात केली आहे. केएल राहुल लखनऊ संघाचे नेतृत्व करण्याची शक्याता आहे.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT