Latest

ख्रिस्तियानो रोनाल्डो : इंस्टाग्रामवर ४०० मिलियन फॉलोअर्स असलेला पहिला व्यक्ती

Shambhuraj Pachindre

पुढारी ऑनलाईन डेस्क 

आतापर्यंतच्या महान फुटबॉलपटूंपैकी एक ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या नावावर फुटबॉल विश्वातील अनेक विक्रम आहेत. त्यासोबतच त्याच्या नाववर सोशल मीडियाशी निगडीत ही काही विक्रम जोडले गेलेले आहेत. आता रोनाल्डो हा जगातील पहिला असा व्यक्ती बनला आहे की ज्याचे लोकप्रिय असणाऱ्या सोशल मीडिया अॅप इंस्टाग्रामवरती ४०० मिलियन पेक्षा अधिक फॉलोअर्स झाले आहेत.

पोर्तुगीज स्टार रोनाल्डोने काही दिवसांपूर्वीच 37 वा वाढदिवस साजरा केला. त्याला जगभरातून शुभेच्छा दिल्याबद्दल त्याने त्याच्या सर्व चाहत्यांचे आभार मानले. आभार मानताना असताना रोनाल्डो म्हणतो की, "आयुष्य हे एक रोलर कोस्टर रोईड सारखे आहे. कठोर परिश्रम, वेग, उद्दिष्टे, अपेक्षा… पण शेवटी, हे सर्व कुटुंब, प्रेम, प्रामाणिकपणा, मैत्री, मूल्ये या सर्व गोष्टींवर अवलंबून आहे. आपण वाढदिनी दिलेल्या सर्व संदेशांसाठी धन्यवाद.! ३७ वर्ष आणि तेथून पुढे…! असे त्याने त्याच्या सोशल प्लॅटफॉर्मवर लिहिले आहे.

यावयात शिखराच्या ऊंचीवर असताना अनेक खेळाडू खेळातून निवृत्ती घेत असतात. परंतु, रोनाल्डो या वयात निवृत्ती घेईल याची काही चिन्हे दिसत नाहीत. काही दिवसांपूर्वी ईएसपीएनला दिलेल्या मुलाखतीत, मँचेस्टर युनायटेडच्या या स्टारने सांगितले की, त्याला किमान चाळीशीचा टप्पा पार करेपर्यंत खेळण्याची त्याची इच्छा आहे.

मला कायम वाटते की, मी 30 वर्षांचा आहे. मी माझ्या शरीराची आणि माझ्या मनाची खूप काळजी घेत असतो. मला हे समजले की, ३७ वर्षांनंतर मला विश्वास आहे की मला पाहिजे तसा मी खेळू शकतो आणि त्याला माझे शरीर साथ देईल. खर ही लढाई आहे ती मानसिकतेची. मी ४०, ४१ किंवा ४२ वर्षांचा होईपर्यंत खेळणार. परंतु सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे माझे रोजचे ध्येय आहे की त्या क्षणाचा आनंद घेणे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT