Latest

COVID-19 Vaccinated Campaign : भारताने ३४ लाख जीव वाचविले; १८ अब्ज डॉलरवर वित्तहानी टाळली

अमृता चौगुले

वॉशिंग्टन; वृत्तसंस्था : कोरोना काळात प्रचंड लोकसंख्येच्या भारत देशाने यशस्वीपणे आणि योग्यवेळी लॉकडाऊन तसेच कोरोना लसीकरण मोहीम राबवून इतर देशांच्या तुलनेत स्वत:ला वेगाने सावरले. व्यापक लसीकरण मोहिमेमुळे देशातील 34 लाखांहून अधिक जीव वाचविण्यात भारत यशस्वी ठरला आहे. (COVID-19 Vaccinated Campaign)

अर्थव्यवस्थाही त्यामुळेच रुळावर आली आणि देशाचे 18.3 अब्ज डॉलरचे (15.17 लाख कोटी रुपये) संभाव्य आर्थिकही नुकसानही टळले. 11 एप्रिल 2020 पर्यंत भारतातील कोरोना रुग्णसंख्या 7500 पर्यंत पोहोचली होती. लॉकडाऊन नसता तर ती 2 लाखांपर्यंत पोहोचली असती, असे या अहवालात म्हटले आहे. (COVID-19 Vaccinated Campaign)

अमेरिकेतील स्टॅनफोड विद्यापीठाच्या एका अहवालातून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. 'हिलिंग द इकॉनॉमी : एस्टिमेटिंग द इकॉनॉमिक इम्पॅक्ट ऑन इंडियाज व्हॅक्सिनेशन अँड रिलेटेड इश्यू' हा या विद्यापीठाचा अहवाल भारताचे केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी शुक्रवारी जारी केला. 'इकॉनॉमिक इम्पॅक्ट ऑफ व्हॅक्सिनेशन अँड रिलेटेड इश्यू'च्या 'द इंडिया डॉयलॉग' या व्हर्च्युअल सत्रातही मांडवीय यांनी सहभाग नोंदविला. (COVID-19 Vaccinated Campaign)

लघुउद्योगांना पाठबळ

कोरोना काळात लघुउद्योगांना एक कोटीवर एमएसएमई साहाय्य दिले. त्यामुळे अर्थव्यवस्थेला 100.26 अब्ज डॉलर (8.31 लाख कोटी रुपये) लाभ झाला. जीडीपीच्या तुलनेत तो 4.90% आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने जानेवारी 2020 मध्ये कोरोना आणीबाणी जाहीर केली होती. तत्पूर्वीच भारताने या महामारीशी लढण्याची तजवीज करून ठेवलेली होती.
– मनसुख मांडवीय, केंद्रीय आरोग्यमंत्री

आकडे बोलतात…

  • 80 कोटी लोकांना मोफत धान्य दिले
  • 2.17 लाख कोटी रुपयांचा त्यावर खर्च
  • 40 लाख कामगारांना रोजगार दिला
  • 40 हजार कोटी रुपयांचा त्यावर खर्च
  • 52 प्रयोगशाळांचे जाळे देशात विणले
  • 220 कोटी लसींचे डोस जनतेला मोफत

अधिक वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT