Latest

“पोलीस आता आझमच्‍या म्‍हशी पकडत नाहीत, अतिकला गोळ्या घालतात…” युपी उपमुख्‍यमंत्र्यांच्‍या मुलाचे वादग्रस्‍त विधान

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : उत्तर प्रदेशचे पोलीस आता आझम खानच्या म्हशी पकडत नाहीत. तर अतिकला गोळ्या घालण्याचे काम करतात, असे वादग्रस्‍त विधान उत्तर प्रदेशचे उपमुख्‍यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांचे पुत्र योगेश मौर्य यांनी केले. भारवारी येथे शनिवारी ( दि. २७) झालेल्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा कविता सरोज यांच्या शपथविधी समारंभात ते बोलत होते.

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

योगेश मौर्य शपथविधी कार्यक्रमाला विशेष पाहुणे म्हणून हजर होते. यावेळी ते म्‍हणाले, "डीएम साहेबांचे पोलिस आता आझम खानच्‍या म्‍हशी पकडण्याचे काम करत नाहीत, अतिकला गोळ्या घालण्याचे काम करतात." आपलं भाषण संपल्‍यानंतर ते व्‍यासपीठावरून आपल्‍या खुर्चीकडे जात असताना या कार्यक्रमाला उपस्‍थित अधिकारी व नेते हसत असल्‍याचे व्‍हायरल व्‍हिडिओमध्‍ये दिसत आहे. आपल्या भाषणात भाजप सरकारच्या विकासकामांची माहिती देताना योगेश मौर्य यांनी वादग्रस्‍त विधान केले. हे मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर व्‍हायरल होत आहे.

उत्तर प्रदेशमधील कुख्‍यात गँगस्टर अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद यांची १५ एप्रिल २०२३ रोजी प्रयागराजमध्ये वैद्यकीय उपचारासाठी नेत असताना गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. दोघांना पोलिसांनी वैद्यकीय तपासणीसाठी येथे आणले असता स्थानिक वैद्यकीय महाविद्यालयाजवळ ही घटना घडली. दोघांचा जागीच मृत्यू झाला. मारेकर्‍यांनी पोलिसांसमोर शरणागती पत्‍करली होती.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT