Latest

Congress on BJP manifesto: भाजपच्या ‘संकल्प पत्रा’वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, “जनतेसाठी काही नाही….”

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने आज (दि.१४) संकल्प पत्र नावाने जाहीरनामा प्रसिद्ध केला. पीएम मोदींच्या हस्ते भाजपच्या सकल्प पत्राचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी गृहमंत्री अमित शहा, भाजपा अध्यक्ष जे.पी नड्डा आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन उपस्थित होत्या. यानंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजपच्या 'संकल्प पत्रा'वर पहिलीच प्रतिक्रिया दिली आहे. (Congress on BJP manifesto)

भाजपच्या 'संकल्प पत्रा'वर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, " आपल्या कार्यकाळात त्यांनी (पंतप्रधान मोदी) देशातील जनता, तरुण आणि शेतकरी यांना फायदा होईल असे कोणतेही मोठे काम केलेले नाही. महागाई एवढी वाढली आहे की, त्यांची त्यांना चिंता नाही. त्यांनी (PM मोदी) आधी दाखवलेल्या ट्रेलरमध्ये डिझेल-पेट्रोल किंवा गॅस सिलिंडरच्या किमती कमी करण्याबाबत काहीही बोलले नाही. यावरून त्यांच्याकडे जनतेला देण्यासारखे काही विशेष नाही, हे स्पष्ट होते, असाही खरगे यांनी मोदी सरकारवर आरोप केला आहे. (Congress on BJP manifesto)

आम्ही (काँग्रेस) अन्न सुरक्षा कायदा आणला. तुम्ही जर आम्ही दिलेले रेशन ५ किलोने वाढवले असेल, तर ते काही उपकार नाहीत केले, असे देखील काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजपच्या जाहीरनाम्यावर माध्यमांशी बोलताना दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे. (Congress on BJP manifesto)

हे ही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT