Compact City  
Latest

Compact City : वृद्धांसाठी जपान बनवत आहे ‘कॉम्पॅक्ट सिटी’

Arun Patil

टोकियो : जपानमध्ये वृद्ध लोकांची लोकसंख्या सुमारे 3 कोटी 61 लाखांच्या आसपास आहे. ती एकूण लोकसंख्येच्या 28.7 टक्के आहे. अशा स्थितीत आता जपान आपल्या शहरांना (Compact City) वाढलेल्या वृद्ध लोकसंख्येच्या हिशेबाने तयार करीत आहे. जपानची राजधानी टोकियोपासून सुमारे 250 किलोमीटरवर असलेलया तोयामा शहराला यासाठी 'रोल मॉडेल' म्हणून निवडण्यात आले आहे.

या शहराच्या विकासासाठी समांतर 'कॉम्पॅक्ट सिटी' (Compact City) धोरण स्वीकारण्यात आले आहे. त्यामुळे सार्वजनिक वाहतुकीचा वापर वृद्ध लोक सहजपणे करू शकतील. दुसर्‍या जागतिक युद्धाच्या काळात या शहराचा 99 टक्के भाग नष्ट झाला होता. मात्र, त्यानंतर शहराची वेगाने पुन्हा निर्मिती करण्यात आली. 1990 च्या दशकापासून 4 लाख 14 हजारांची लोकसंख्या असलेले हे शहर वृद्धांची वाढलेली लोकसंख्या, वाढलेली बिले, घसरलेला महसूल आणि जुन्या काळातील शहरी योजना यासारख्या समस्यांशी झुंजू लागले. आता तोयामाचा संघर्ष आणि विकास एक मापदंड म्हणून पुढे आले आहे.

जपानची पहिली लाईट रेल्वे लाईन शहराच्या मध्यातून जाते जी मध्यकालीन किल्ल्याला पार करून उत्तरेकडे एका जुन्या किल्ल्यापर्यंत जाते. याठिकाणी एका जुन्या किल्ल्याला हॉट स्प्रिंग एक्सरसाइज पुलाबरोबर एका सेंटरच्या धर्तीवर तयार करण्यात आले आहे. जागतिक बँकेनुसार नव्या लाईट रेल्वेसाठी जुन्या रेल्वे रूळांना पुन्हा तयार करण्यात आले होते त्यामुळे गुंतवणुकीत 75 टक्के कमी आली. जागतिक बँक कॉम्पॅक्ट शहरांसाठी (Compact City) तोयामाला एक वैश्विक 'रोल मॉडेल' मानते.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT