नगर : पुढारी वृत्तसेवा : नव्वदी ओलांडलेली एक महिला रात्री साडेअकराला जिल्हाधिकार्यांच्या मोबाईलवर फोन करते आणि जिल्हाधिकारीही त्याची लगेच दखल घेऊन कार्यवाही करतात, त्या आजींना हवे असलेली मदत मिळते… आणि याआजी जिल्ह्याधिकार्यांच्या या तत्परतेचे तोंडभरून कौतुकही करतात.. त्याचे असे झाले… 2 ऑगस्टला रात्री 11 वाजता जिल्हाधिकारी सालीमठ यांचा मोबाईल खणखणला. सावेडीतील आनंदनगर भागात 93 वर्षांंच्या छबुबाई चित्रा कदम या एकल महिलेने त्यांना प्रशासनाच्या मदतीची गरज असल्याचे सांगितले. जिल्हाधिकार्यांनी तातडीने अन्नधान्य वितरण अधिकारी अर्चना पगारे व संजय गांधी निराधार योजनेचे तहसीलदार विशाल नाईकवाडी यांना फोन केला आणि छबुबाई यांना लगेच मदत करण्याच्या सूचना दिल्या.
त्यानंतर या दोन्ही अधिकार्यांनी संपर्क साधून महिलेस पिवळी शिधापत्रिका मंजूर केली आणि धान्य देण्याची व्यवस्था केली. श्रावणबाळ वृद्धापकाळ योजनेतूनही दरमहा दीड हजार रुपयांचे वेतन त्यांना मंजूर करण्यात आले. समाजात अनेक गरजू व्यक्ती, एकल महिला, विधवा, अपंग, निराधार आहेत. या सर्वांना शासनाच्या योजनांचा लाभ देऊन त्यांचे जीवन सुकर होईल, त्याच वेळी महसूल सप्ताह खर्या अर्थाने साजरा होईल, असे मत जिल्हाधिकार्यांनी व्यक्त केले.
हेही वाचा :