पुढारी ऑनलाईन डेस्क : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभेत भाजपवर कडाडून हल्ला चढवला. देश मोदींविरोधात होता तेव्हा बाळासाहेबांनी साथ दिली होती. मर्द असाल तर समोर येऊन लढा, मग आम्ही बघू असे सांगत त्यांनी भाजपकडून होत असलेल्या आरोपांना उत्तर दिले.
मुख्यमंत्री काय म्हणाले ?
- ५ वेळा आमदार, मंत्री झालेला माणूस दाऊदचा हस्तक होता ते कळालं नाही का ?
- मुदस्सीर लांबेची नियुक्ती विनोद तावडे यांनी केली
- पहाटेचा शपथविधी यशस्वी झाला असता, तर देशमुख, मलिक चालले असते ना ?
- कुटुंबाची बदनामी ही विकृती आहे
- हर्षवर्धन पाटलांना झोप लागत नव्हती मग त्यांनी झोपेचं औषध घेतलं
- दुसऱ्यांना वाईट म्हणता, तर स्वत: किती चांगले आहात ते सांगा
- ओसामाला घुसून मारलं तसं दाऊदला घुसून मारा
- मर्द असाल, तर समोर येऊन लढा मग आम्ही बघतो
- कुटुंबाची बदनामी का करता
- लढता येत नाही, म्हणून शिखंडीसारख्या तपास यंत्रणा मध्ये आणल्या
- राज्यपालांचे महत्त्व विरोधी पक्षांनाही माहीत आहे
- हजारो किमी दूर आपण कोरोना कालावधीमध्ये ऑक्सिजन आणला
- दाऊद एके दाऊद करत विंदांच्या कवितेप्रमाणे देवेंद्र फडणवीसजी तुम्ही तेचं केलं
- काही जणांचे मृतदेह नदीत सापडले आम्ही तसं काही केलं नाही
- मुंबई पालिका शाळेत प्रवेशासाठी रांग लागते
- कोरोना काळात राज्य सरकारने उत्तम कामं केल
- द्वेषाची काविळ झालेल्यांना आमच्याकडे उत्तर नाही
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.
'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.
Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.