Latest

CM Eknath Shinde: दहशतवादविरोधी लढाई सामुहिकपणे लढली पाहिजे; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन : दहशतवाद संपूर्ण जगासमोरचा महत्त्वाचा मुद्दा आहे. दहशतवाद मुळासकट संपवणे हाच या परिषदेचा मुख्य उद्देश असून, दहशतवादाची ही लढाई सगळ्या देशांनी सामुहिकपणे लढली पाहिजे असे मत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले आहे. ताज हॉटेलमध्ये या दहशतवादविरोधी संयुक्त राष्ट्र संघटनेच्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. परिषदेदरम्यान ते माध्यमांशी बोलत होते.

मुंबईमध्ये 26/11 ला जे घडले ते या देशात कोणीही विसरू शकत नाही. आज ते हरियाणात सर्व राज्याच्या गृहमंत्र्यांशी संवाद साधत आहेत.  आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह हे दहशतवादाविरोधी लढण्यास पूर्णपणे सक्षम आहेत आणि आम्ही सर्व त्यांच्यासोबत आहोत.  दहशतवादाविरुद्धची लढाई ही कोणी एकाने नाहीतर सर्वांनी एकत्रितपणे लढण्याची गरज असल्याचे मतही मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केले.

ताज हॉटेलमध्ये संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या दहशतवादविरोधी समितीची बैठक पार पडली. या बैठकीपूर्वी सुरक्षा परिषदेला परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्यासोबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच सर्व देशांचे राजदूत उपस्थित होते.  यादरम्यान 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. सर्वप्रथम परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी ताज हॉटेलमधील हुतात्मा स्मारकावर पुष्पहार अर्पण केला. यानंतर परराष्ट्रमंत्र्यांनी दहशतवादावर पाकिस्तानला चांगलेच घेरले. या महत्त्वाच्या बैठकीत दहशतवादाशी मुकाबला करण्याच्या सर्व सूचना आणि पद्धतींवर चर्चा करण्यात आली असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे,

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT