पुढारी ऑनलाईन डेस्क : शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी शुक्रवारी शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला. त्यांनंतर आज त्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या शिंदे गटाच्या 'नेत्या' म्हणून नियुक्ती केली आहे. पक्षाध्यक्षानंतर ज्येष्ठ नेत्यांना हे पद दिले जाते.
विधानभवनातील शिवसेनेच्या पक्ष कार्यालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नीलम गोऱ्हे यांनी प्रवेश केला होता. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे.
काही दिवसांपूर्वी विधान परिषद सदस्य मनीषा कायंदे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर गोऱ्हे यादेखील प्रवेश करतील, अशी चर्चा होती. वर्षभरापूर्वी पक्षात फूट पडल्यानंतरही गोऱ्हे या ठाकरे गटासोबत राहिल्या होत्या. मात्र, त्यांनी शुक्रवारी पक्ष सोडला. यावेळी त्या म्हणाल्या, एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वावर शिवसेना योग्य मार्गावर आहे. महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शिवसेनेत आपण कार्यरत राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा :