Climate Change  
Latest

Climate Change : महाराष्ट्रात येत्या काही महिन्यात ‘उष्णतेची लाट, महापूर, दुष्काळ’; IPCC चा गंभीर इशारा

backup backup

पुढारी ऑनलाइन डेस्क : महाराष्ट्रात येत्या काही महिन्यांत (Climate Change) उष्णतेची लाट येईल, त्यानंतर पाण्याची टंचाई आणि अतिवृष्टीमुळे जीवसृष्टीला तसेच पिकांना धोका निर्माण होऊ शकतो, असा इशारा आंतर-सरकारी पॅनेल ऑन क्लायमेट चेंज (IPCC) च्या सहाव्या मूल्यांकन अहवालाच्या विश्लेषणात दिला आहे.

असार सोशल इम्पॅक्ट अॅडव्हायझर्स या सोशल इम्पॅक्ट स्टार्ट-अपच्या अहवालाच्या विश्लेषणात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्य कृषीप्रधान असून शेतीसाठी मोठ्या प्रमाणात पावसावर अवलंबून आहे, पर्जन्यमानाच्या पद्धतीत कोणताही बदल (Climate Change) झाला तर पाण्याच्या उपलब्धतेत लक्षणीय परिणाम होतील. याचा थेट परिणाम शेती, घर आणि उद्योगांसाठी लागणा-या पाणी पुरवठ्यावर होऊ शकतो.

याशिवाय तापमान आणि पर्जन्यमानातील बदलांचा पीक उत्पादन आणि अन्नसुरक्षेवरही महत्वपूर्ण परिणाम होऊ शकतो, असा अंदाज देखील त्यात व्यक्त करण्यात आला. या अहवालाने असेही सूचवले आहे की तापमान आणि पर्जन्यमान बदल (Climate Change) काही पिकांच्या वाढीसाठी खूप कठीण ठरेल तर काही पिकांना उबदार हवामानाचा फायदा होऊ शकतो.

महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित करून असारने तयार केलेल्या (Climate Change) IPCC अहवालात असे म्हटले आहे. अलिकडच्या वर्षांत महाराष्ट्राने आधीच पाणीटंचाई आणि भीषण पूर अनुभवला आहे. भविष्यात ही परिस्थिती अधिक सामान्य होऊ शकते.

(Climate Change) 21 व्या शतकाच्या अखेरपर्यंत समुद्राची पातळी 1.1 मीटर वाढू शकते

अहवालात समुद्राच्या पातळीबाबतही विश्लेषण देण्यात आले आहे. अहवालात म्हटले आहे, महाराष्ट्राला लांबलचक समुद्रकिनारा आहे आणि समुद्राच्या पातळीत वाढ झाल्याने किनारपट्टीवरील समुदाय आणि पायाभूत सुविधांना धोका निर्माण होऊ शकतो. अहवालात चेतावणी देण्यात आली आहे की शतकाच्या अखेरीस समुद्राची पातळी 1.1 मीटरपर्यंत वाढू शकते, ज्यामुळे किनारपट्टीवर पूर आणि धूप वाढू शकते," असा इशारा देऊन यासाठी आतापासूनच सुरक्षेच्या उपाययोजना करण्याचे सूचवले आहे. (Climate Change)

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT