National Cinema Day 2023  
Latest

Cinema Lovers Day : उद्या ‘हे’ चित्रपट पाहा फक्त ९९ रुपयांमध्ये

Shambhuraj Pachindre

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'सिनेमा लव्हर्स डे' (Cinema Lovers Day) निमित्त फक्त ९९ रुपयांमध्ये चित्रपटगृहांमध्ये चित्रपट पाहायला मिळणार आहेत. २० जानेवारी २०२३ रोजी 'सिनेमा लव्हर्स डे' निमित्त ही ऑफर लागू केली आहे. सध्याच्या महागाईच्या जमान्यात ९९ रुपयांमध्ये सर्त्‍वोकृष्‍ट चित्रपट पाहायला मिळणे ही सिनेमाप्रेमींसाठी पर्वणी ठरणार आहे.  महाराष्ट्र, केरळ, तामिळनाडू, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश राज्‍यांमध्‍ये तिकिटाचा दर ९९ रुपये असणार आहे.

मल्टीप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडिया (MAI) ने 23 सप्टेंबर रोजी ७५ रुपयांमध्‍ये तिकिट ऑफर करून राष्ट्रीय सिनेमा दिन साजरा केला होता. या उपक्रमाला देशभरात उत्‍स्‍फूर्त  प्रतिसाद मिळाला होता. थिएटर्स हाउसफुल्‍ल झाले. या उपक्रमाला जबरदस्त यश मिळाले होते.

PVR च्या अधिकृत ट्विटर हँडलने केलेले ट्विटमध्ये असे म्हटलं आहे की, "आम्ही Cinema Lovers Day साठी जादुई किंमतीत चित्रपटांची जादू साजरी करत आहोत! २० जानेवारी २०२३ रोजी PVR वर फक्त ₹99 मध्ये चित्रपट पहा. कोणत्याही चित्रपटासाठी, कोणत्याही शोसाठी लागू; त्यामुळे लवकरात लवकर तुमची तिकिटे बुक करा!" या ऑफरची तिकिटे तुम्ही बॉक्स ऑफिस काउंटर किंवा PVR सिनेमा ॲप, वेबसाइटवरून किंवा किंवा बुक माय शोवरूनदेखील खरेदी करू शकता.

Cinema Lovers Day निमित्त हे चित्रपट ९९ रुपयांमध्‍ये पाहता येणार

सिनेमाप्रेमींना २० जानेवारी रोजी १०० रुपयांमध्‍ये वेड, अवतार: द वे ऑफ वॉटर (थ्रीडी),पुस इन बूटस् (थ्रीडी), वारिसू, वॉल्टेअर वीराय्या, कुत्ते, वाळवी, वीरा सिम्हा रेड्डी, आणि थुनिवू पाहण्याची संधी मिळेल.

Avatar 2 ने चाहत्यांच्या आवडत्या अ‍ॅव्हेंजर्स एंडगेमला ओलांडून भारतात आधीच 470 कोटी रुपयांची कमाई केली आहे. कमी झालेल्या तिकिटांच्या किमतींमुळे चित्रपट अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे.

कोरोनाच्या महामारीनंतर सिनेमागृहे प्रेक्षकांच्या प्रचंड गर्दीच्‍या प्रतिक्षेत आहेत. आता परिस्थिती सामान्य होत असताना सिनेमा लव्हर्स डेच्या माध्यमातून कंपन्यांनी पुन्हा एकदा प्रेक्षकांना सिनेमागृहापर्यंत आणण्याचा प्रयत्न केला आहे.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT