Latest

China’s Mars mission : चीनची मंगळ मोहीम अखेर ठरली अपयशी!

Arun Patil

बीजिंग : अमेरिकेच्या 'नासा'ने म्हटले आहे की चीनची मंगळ मोहीम अपयशी ठरली आहे. चीनचे 'जुराँग' नावाचे रोव्हर (China's Mars mission) मंगळभूमीवर अनेक महिन्यांपासून एक इंचही पुढे सरकलेले नाही. धुळीची वादळे, अत्याधिक थंड वातावरण यामुळे सौरऊर्जेवर संचालित होणारे हे रोव्हर गेल्या वर्षीपासून निष्क्रिय पडले आहे.

'नासा'च्या मार्स रिकनायसन्स ऑर्बिटरने (China's Mars mission) या रोव्हरची काही छायाचित्रे टिपली आहेत. या छायाचित्रांच्या एका सीरिजचे निरीक्षण करता हे रोव्हर किमान 20 सप्टेंबर 2022 पासून एक इंचही पुढे सरकलेले नाही. हे मार्स रोव्हर खराब झालेले असून ते आता कधीही काम करू शकणार नाही अशीच चिन्हे आहेत. अमेरिकेतील अ‍ॅरिझोना विद्यापीठातील हायराईज टीमने जुराँग मार्स रोव्हरबाबतची तीन मते मांडली. मार्स रिकनायसन्स ऑर्बिटरच्या हायराईज कॅमेर्‍याने टिपलेल्या छायाचित्रात हे रोव्हर गुलाबी रंगाच्या बिंदूसारखे दिसून येते.

मंगळभूमीवरील युटोपिया प्लॅनिशियाच्या (China's Mars mission) आसपासच्या क्षेत्रात हे रोव्हर असून त्याच्याजवळ एक खड्डाही आहे. पहिले छायाचित्र 11 मार्च 2022 चे, दुसरे 8 सप्टेंबर 2022 चे आणि सर्वात ताजे छायाचित्र 7 फेब्रुवारी 2023 चे आहे. या सर्व छायाचित्रांमध्ये हे रोव्हर एकाच ठिकाणी दिसत आहे. अर्थात खुद्द चीनने जुराँग रोव्हरशी संबंधित कोणतीही माहिती जगाला दिलेली नाही! चीनचे सरकार ज्याप्रमाणे सर्व बाबतीत गोपनीयता बाळगते तसेच चिनी अंतराळ संस्थाही आपल्या सर्व गोष्टी गुप्तच ठेवते.

हेही वाचा ; 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT