अभ्यास करताना मुलांना उत्साह आणि सहजपणा वाटणे आवश्यक असते. त्यासाठी मुलांच्या अभ्यासाची खोली थोडी काळजीपूर्वक पद्धतीने सजवावी. खोलीमध्ये फर्निचर बसवताना केवळ आकर्षकतेचाच विचार न करता मुलांची सोय आणि सहजता यांचा विचार करावा. अभ्यासाला बसताना पाठीला आरामदायी वाटेल अशी खुर्ची निवडावी. (Study Room)
तसेच मुलांच्या उंचीनुसार लिहिण्याचे टेबल आणि कपाटं बनवावीत. खुर्चीवर बसल्यानंतर मुलांचे पाय टेकले जातील आणि पाठ सरळ राहील याकडे लक्ष द्यावे. कारण, पाय सतत तरंगते राहिल्यास पाठीचे आजार उद्भवू शकतात. मुल लहान असेल तर कमी जागा लागेल म्हणून पुस्तके ठेवण्यासाठी लहान कपाट बनवली जातात. (Study Room)
परंतु, काही वर्षांनंतरचा विचार करून आधीपासून पुस्तके ठेवण्यासाठी पुरेशी कपाटं करावीत; कारण नववी-दहावीत गेल्यानंतर मुलांना भरपूर वह्या, पुस्तके लागत असतात. त्यावेळी अडचण निर्माण होऊ नये म्हणून त्याचा विचार आधीच करावा, म्हणजे नंतर फर्निचर बदलासाठी वेगळा खर्च करावा लागणार नाही.
अभ्यासाच्या खोलीत भरपूर प्रकाश असावा. त्यासाठी मोठी खिडकी अथवा बाल्कनी असावी. यामुळे खोलीत हवा खेळती राहील आणि नैसर्गिक प्रकाशही येईल. या खोलीमध्ये रीडिंग लॅम्प ठेवावा; परंतु त्याचा दर्जा चांगला असावा. दीर्घकाळ अभ्यास करायचा असल्यास अँटीग्लेअर लाईटचा वापर करावा. अभ्यासाच्या खोलीचा दरवाजा आणि खिडक्या व्यवस्थित बंद होणार्या असाव्यात. जेणेकरून बाहेरील आवाज आत येणार नाही तसेच खिडकीतून पावसाचे पाणी आत येऊन पुस्तके, वह्या खराब होणार नाहीत. रहदारीच्या रस्त्यावर घर असल्यास खिडक्यांना दुहेरी काचा लावाव्यात. म्हणजे गाड्यांचा आवाज येणार नाही.
या खोलीचं फ्लोअरिंगदेखील विचारपूर्वक करावे. प्रकाश परावर्तित होण्यासाठी खोलीला पांढर्या रंगाच्या अथवा ऑफव्हाईट रंगाच्या टाईल्स लावाव्यात. खोलीच्या भिंती फिक्कट रंगानेच रंगवाव्यात. सध्या गडद रंगाची फॅशन आहे; पण आकाशी, पिस्ता, क्रीम असे रंग भिंतींना असल्यास ते डोळ्यांना सुखावतात. त्यामुळे अशाच रंगांचा वापर करावा.
हेही वाचा;