खुलताबादेत मतदान मशीन बंद 
Latest

छत्रपती संभाजीनगर : खुलताबादेत मतदान मशीन बंद; ३ तासानंतर मतदान सुरू

निलेश पोतदार

खुलताबाद; पुढारी वृत्तसेवा छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणुकीसाठी खुलताबाद शहरातील पंचायत समिती येथील बुध क्र ५६ वर सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाली. १० वाजण्याच्या सुमारास एका मतदाराने जास्त वेळ बटन दाबून ठेवल्याने मशीन काही काळ बंद पडले. त्यावेळी मतदान केंद्रावर २०३ मतदान झाले होते. परत ११ वाजण्याच्या सुमारास मशीन क्र १ बंद पडले. त्यावेळी जवळपास २८७ मतदारांनी मतदान केले होते.

मतदान मशीन क्र १ बंद पडल्याने प्रशासनाकडून मशीन बदल करून दुसरे मशीन लावण्याचे कामा सुरू केले. मात्र सकाळी ९ वाजल्‍यापासून मतदानासाठी उभे असलेले मतदार १२ वाजेपर्यंत जवळपास ३ तास ताटकळत उभे होते. मतदाना साठी गर्दी वाढत होती. यामुळे नवतरुण वर्ग निघून जात होता. मतदानासाठी उभ्या असलेल्या वयोवृद्ध महिलांना यामुळे ताटकळत रहावे लागले. प्रशासनाच्या वतीने त्यांना बसण्यासाठी कुठलीच व्यवस्था करण्यात येत नव्हती. प्रशासनाच्या अथक प्रयत्नानंतर दुसरे मशीन टेस्ट करून सुरू करण्यात आले.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT