Latest

Chhagan Bhujbal : कुणाचा फोटो दाखवून मतं घ्या, असं कधी म्हणालो नाही : छगन भुजबळ यांचे स्पष्टीकरण

गणेश सोनवणे

पुढारी ऑनलाइन डेस्क – कुणाचे फोटो दाखवून मते घ्या, असे मी कधीही म्हणालो नाही. पवार साहेबांनी मुंडे, भुजबळ, मुश्रिफ यांना टार्गेट करुन त्यांच्या मतदारसंघात सभा घेतल्या व टिका केली. मग मी कशाला कुणाला सांगेल की त्यांचा फोटो दाखवा आणि मते घ्या. मी कधीही असे सांगितले नाही की, शरद पवारांचा फोटो दाखवा आणि मते घ्या अशी प्रतिक्रीया अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी दिली आहे.

राष्ट्रवादीच्या फुटीनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्षाचे नाव व चिन्ह हे अजित पवार गटाला दिल्याने त्याविरोधात शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर सुनावणी दरम्यान, जेष्ठ वकिल अभिषेक मनू सिंघवी यांनी छगन भुजबळ यांचे एक वक्तव्य न्यायालयासमोर वाचून दाखवले. मतदारांना आकर्षित करण्यासाठी शरद पवारांचा फोटो व चिन्हाचा वापर होत असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यावर काल न्यायालयाने अजित पवार गटाला फटकारलं. शरद पवारांचा फोटो वापरणार नाही अशी लेखी हमीच द्यावी, असे आदेश न्यायालयाने दिले.

त्यावर भुजबळ म्हणाले, वकिल सिंघवी यांना चुकीची माहिती दिली जात आहे. मी आजवर कधीही पवारांचा फोटो दाखवून मते घ्यावी असे म्हणालो नाही. त्यांच्यासोबत काम करत होतो तेव्हाही नाही. मुळात अजित पवार गट वेगळा झाला तेव्हापासून निवडणूकच झाली नाही. ग्रमापंचायतीच्या निवडणूका झाल्या त्यात चिन्ह व फोटोचा काही संबंध येत नाही.

भुजबळ सॉप्ट टार्गेट वाटतो

घड्याळ हे चिन्ह तर निवडणूक आयोगानेच आम्हाला दिलं आहे. पण आजून त्याचाही प्रचार करण्याची वेळ आमच्यावर आली नाही. कारण ग्रामीण भागात अजून निवडणूकच आलेली नाही. वकिलांना चुकीची माहिती कोण पुरवत पाहावं लागेल.  छगन भुजबळ यांना सॉप्ट टार्गेट वाटतो. कोर्टाची दिशाभूल पवार गटाकडून होत आहे असा आरोप भुजबळांनी केला आहे.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT