Latest

Chennai Super Kings : सीएसकेचा पहिला नंबर; १२ हंगामात ११ वेळा साखळीत पास

backup backup

चेन्नई सुपर किंग्जने ( Chennai Super Kings ) सनरायझर्स हैदराबादचा सहा विकेट्सनी पराभव केला. या विजयाबरोबरच सीएसकेने १८ गुण मिळवत प्ले ऑफमध्ये प्रवेश केला. यंदाच्या हंगामात प्ले ऑफमध्ये प्रवेश करणारी सीएसके ही पहिली टीम ठरली.

चेन्नई सुपर किंग्जने ( Chennai Super Kings ) नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी सनरायझर्स हैदराबादला १३४ धावात रोखले. सीएसकेकडून जोस हेजलवूडने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या. त्याला ब्राव्होने २ तर ठाकूर आणि जडेजाने प्रत्येकी १ विकेट घेत चांगली साथ दिली. हैदराबादकडून वृद्धीमान साहाने सर्वाधिक ४४ धावा केल्या. इतर फलंदाजांना फारशी चमक दाखवता आली नाही.

चेन्नईची दमदार सलामी ( Chennai Super Kings )

हैदराबादचे हे १३५ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या चेन्नई सुपर किंग्जने ( Chennai Super Kings ) चांगली सुरुवात केली. ऋतुराज गायकवाड आणि फाफ ड्युप्लेसिसने १० षटकात ७५ धावांची सलामी दिली. गायकवाड ४५ धावांवर बाद झाला. त्यानंतर ड्युप्लेसिस आणि मोईन अलीने संघाला शतकी मजल मारून दिली.

मात्र त्यानंतर सीएसकेच्या फलंदाजीला होल्डरचे ग्रहण लागले. राशिद खानने मोईन अलीचा अडसर दूर केल्यानंतर जेनस होल्डरने एकाच षटकात सेट झालेल्या ड्युप्लेसिसला ४१ धावांवर तर सुरेश रैनाला २ धावांवर बाद करुन सीएसकेचे टेन्शन वाढवले.

विजयावर व्हिंटेज धोनीची मोहर( Chennai Super Kings )

बॉल टू रन सामना आल्यावर कर्णधार एमएस धोनी आणि अंबाती रायडू यांनी संयम दाखवत सामना शेवच्या षटकापर्यंत नेला. अखेरच्या षटकात संधी मिळताच रायडू आणि धोनीने मोठे फटके मारत सामना आपल्या आवाक्यात आणला. अखेर ३ चेंडूत २ धावांची गरज असताना धोनीने आपल्या व्हिंटेज स्टाईलने षटकार मारत सामना खिशात टाकला.

या विजयाबरोबरच सीएसकेने प्ले ऑफमध्ये दिमाखात प्रवेश केला. सीएसकेने आतापर्यंत खेळलेल्या १२ हंगामापैकी ११ हंगामात प्ले ऑफमध्ये प्रवेश मिळवण्याची कामगिरी केली आहे. चेन्नई सुपर किंग्जला फक्त २०२० च्या हंगामात पात्रता फेरी पार करण्यात अपयश आले होते. सध्या सीएसके गुणतालिकेत ११ पैकी ९ सामने जिंकत १८ गुण मिळवून अव्वल स्थानावर आहे.

हेही वाचले का?

[box type="shadow" align="" class="" width=""][visual_portfolio id="40771"][/box]

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT