Latest

Char Dham Yatra : चार धाम यात्रेवर खराब हवामानाचे संकट; यात्रा रोखली

backup backup

पुढारी ऑनलाइन डेस्क : Char Dham Yatra : चार धाम यात्रा सुरू झाली असून 22 एप्रिलला गंगोत्री आणि यमुनोत्री चे द्वार उघडले. तर 25 एप्रिलला केदारनाथ धाम आणि 27 एप्रिलला बदरीनाथ धामचे द्वार उघडले आहे. केदारनाथ आणि बदरीनाथ धामचे द्वार उघडले त्यावेळी शेकडो भाविकांनी तिथे दर्शनासाठी गर्दी केली होती. मात्र, सध्या चार धाम यात्रेवर खराब हवामानाचे संकट कोसळले आहे. त्यामुळे काही ठिकाणी या यात्रा थांबवण्यात आल्या आहेत.

उत्तराखंडच्या चामोली येथे वातावरण खराब झाल्याची माहिती आहे. तेथील स्थानिक पोलिसांनी माहिती दिली आहे. एएनआयने ट्वीट करून याचा व्हिडिओ पब्लीश केला आहे. चामोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोतवाली चमोली हद्दीतील बाजपूर येथील डोंगरावरून ढिगारा आल्याने बद्रीनाथ महामार्ग बंद करण्यात आला आहे. Char Dham Yatra

तर रवी सैनी, एसएचओ श्रीनगर, यांनी दिलेल्या माहितीनुसार, केदारनाथ आणि बद्रीनाथ येथील खराब हवामानामुळे खबरदारीचा उपाय म्हणून श्रीनगर पोलिसांनी चारधाम यात्रा थांबवली. श्रीनगरमध्ये राहण्यासाठी पुरेशी व्यवस्था असून प्रवाशांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. हवामान स्वच्छ झाल्यावर प्रवाशांना प्रवास सुरू ठेवण्याचे आवाहन केले जात आहे.

Char Dham Yatra : चार धाम यात्रा रजिस्ट्रेशन कसे करावे?

सामान्यपणे दरवर्षी अक्षय्य तृतीयेपासून चार धाम यात्रेला सुरुवात होत असते. ही यात्रा पुढे चार महिन्यापर्यंत चालते. चार धाम यात्रेला जाण्यासाठी उत्तराखंड सरकारकडे रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे. उत्तराखंड सरकारच्या अधिकृत registrationandtouristcare.uk.gov.in वेबसाइटवर जाऊन रजिस्ट्रेशन करू शकता. याशिवाय touriscareuttarakhand या मोबाइल अॅपवरून देखिल रजिस्ट्रेशन करू शकता.

उत्तराखंड सरकारने आता चार धाम यात्रेसाठी कॉलसेंटर सुरू केले आहे. त्यासाठी टोल फ्री नंबर जाहीर करण्यात आला आहे. 01351364 आणि 1364 ही टोल फ्री नंबर आहेत. याशिवाय 8394833833 या क्रमांकावर Whats'app वर Yatra असा मेसेज लिहून पाठवा.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT