Chandrayan 3 isro 
Latest

Chandrayan 3 : चांद्रयान 3, लँडर मॉड्यूलचे अंतिम डिबूस्टिंग ऑपरेशन यशस्वी; आता वेध लँडिंगचे

backup backup

पुढारी ऑनलाइन डेस्क : Chandrayan 3 : चांद्रयान 3 चे लँडर मॉड्यूल वेगळे झाल्यानंतर विक्रम लँडर मॉड्यूलचे अंतिम डिबूस्टिंग ऑपरेशन यशस्वी झाले असून LM कक्षा यशस्वीरित्या 25 किमी x 134 किमी पर्यंत कमी करण्यात आली आहे, अशी माहिती इस्रोने दिली आहे. आज रविवारी (दि.20) पहाटे 1.50 मिनिटांनी लँडर मॉड्यूलचे यशस्वी डिबूस्टिंग करण्यात आले आहे.  बूस्टिंगनंतर विक्रम लँडर मॉड्यूल सुस्थितीत आहे. आता लँडर मॉड्यूल चंद्रापासून अवघ्या 25 किमी अंतरावर आहे. पहिले लँडर मॉड्यूल डिबूस्टिंग 18 ऑगस्टला करण्यात आले होते.

Chandrayan 3 : डिबूस्टिंग प्रक्रिया काय?

लँडरच्या चार चाकांजवळ जोडलेल्या 800 न्यूटन पॉवरच्या 1-1 थ्रस्टरच्या (इंजिन) मदतीने डिबूस्टिंग प्रक्रिया पार पडते. प्रत्येकी 2 थ्रस्टर 2 टप्प्यांत काम करतात आणि स्पेसक्राफ्टचा वेग कमी कमी करत नेला जातो.

आता खरा सामना सुरू झाला आहे. हे अखेरचे षटक आहे. 'चांद्रयान-3'ला सॉफ्ट लँडिंगसाठी 90 अंशात फिरवावे लागेल.
– एम. अन्नादुराई, प्रकल्प संचालक, 'चांद्रयान-3', बंगळूर

  •  कक्षाकुंचन प्रक्रियेनंतर पुढील 5 दिवस लँडर या नव्या कक्षेत राहील.
  • 2 बुधवारी (23 ऑगस्ट) सायंकाळी 5.47 वाजता चंद्राच्या पृष्ठभागापासून 30 कि.मी. अंतरावरून चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल.

Chandrayan 3 : आता वेध सॉफ्ट लँडिंगचे

चांद्रयान 3 च्या लँडरचा वेग यशस्वीरित्या कमी केल्यानंतर आता चंद्रावर प्रत्यक्ष सॉफ्ट लँडिंगच वेध लागले आहेत. सर्व जगाच्या नजरा चांद्रयान 3 कडे लागल्या आहेत. आता बुधवारी संध्याकाळी 5 वाजून 47 मिनिटांनी (आपल्याकडील वेळेनुसार) लँडर जेव्हा चंद्रापासून सर्वात कमी अंतरावर असेल, तेव्हा सॉफ्ट लँडिंगची (चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याचा) संधी घेतली जाईल. लँडिंग प्रक्रियेच्या सुरुवातीला, सेकंदाला सुमारे 1.68 कि.मी. असेल. थ्रस्टरच्या मदतीने तो कमी कमी करत नेत सुरक्षितपणे पृष्ठभागावर उतरवले जाईल.

सध्या चंद्रावर रात्र आहे आणि ती मंगळवारपर्यंत कायम राहील. बुधवारी चंद्रावर सूर्योदय होईल. दिवस उजाडेल… लँडिंगसाठी त्या आसपासची संधी घेतली जाईल. कारण, पुढे प्रज्ञान रोव्हरला अनेक अशी कामे (संशोधने) करायची आहेत, ज्यासाठी उजेड आवश्यक आहे. पुढे चौदा दिवस ते सुरू राहील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT