चंद्रशेखर बावनकुळे 
Latest

उद्धव ठाकरे शरद पवार, काँग्रेसची वकिली करताहेत: चंद्रशेखर बावनकुळे

अविनाश सुतार

नागपूर, पुढारी वृत्तसेवा :  दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी केलेले भाषण रटाळ होते, देश पंतप्रधान नरेंद्र मोदींना परिवाराचा प्रमुख मानत असताना त्यांच्या विरोधाला अर्थ नाही. इंडिया आघाडीत गेल्यामुळे ते शरद पवार आणि काँग्रेसचे वकील झाले आहेत, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना केली. Chandrasekhar Bawankule

स्टालिन यांच्या वक्तव्यावर खुलासा उद्धव ठाकरे यांनी केला नाही. उलट स्टालिन यांच्यासोबत जाऊ हे पुन्हा रेटून सांगितले. विकासाचे मुद्दे उद्धव ठाकरेंकडे नाहीत. व्हिजनलेस व्यक्ती राजकारणात असताना जनतेला कन्फ्युज करत आहे. खरं तर उद्धव ठाकरे हे शरद पवारांच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन बिघडले आहेत, त्यांना काही आठवत नाही. यामुळेच कालचे त्यांचे इंडिया आघाडीच्या प्रवक्त्यांचे भाषण होते. विकासाचे उद्धव ठाकरेंना काहीही कळत नाही, असा इशारा देत बेईमानी करून मुख्यमंत्री पद मिळवले, असा आरोप बावनकुळे यांनी केला.

दरम्यान, निलेश राणे यांच्या नाराजीबाबत बोलताना जीवनात अशी घटना होते, जेंव्हा काहीशी निराशा येते. मी स्वतः रत्नगिरीत जाऊन आलो. निलेश राणे चांगले नेते आहेत. छत्रपती शिवरायांना साक्षी मानून मराठा समाजाला आरक्षण देण्याची पूर्ण जबाबदारी त्यांनी स्वीकारली आहे. आम्हाला अभिमान आहे, मराठा समाजाने मुख्यमंत्री शिंदे यांचे अभिनंदन केले पाहिजे. मनोज जरांगे उपोषण करताहेत याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसारखे जबाबदार नेते छत्रपतींच्या साक्षीने वचन देत आहेत. तर जरांगे पाटलांनी थोडी वाट पाहावी, असे आवाहन केले.

गावबंदी संदर्भात, जर महाराष्ट्रातील सर्व पक्ष आणि नेते आरक्षणाच्या बाजूने आहेत, एकमुखाने मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या बाजूने आहेत, तर मग गावबंदी करून काय फायदा? जरांगे पाटलांनी यावर विचार करावा, असा सबुरीचा सल्ला दिला.

दरम्यान, पंकजा मुंडे यांच्या रक्तात भाजप आहे. त्यांच्या बोलण्यात काही वेगळे नाही. पक्ष, केंद्रीय नेतृत्व योग्य निर्णय करेल. त्या आमच्या नेत्या आहेत. भाजप त्यांच्या मागे उभा आहे. असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी एका प्रश्नी स्पष्ट केले.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT