Latest

Bageshwar Maharaj : धीरेंद्र महाराजांनी नागपूर पत्रकार परिषदेत दिव्यशक्ती सिद्ध करावी : श्याम मानव

backup backup

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक श्याम मानव यांनी धीरेंद्र महाराजांना त्यांच्यातील दिव्यशक्ती सिद्ध करण्यापोटी ३० लाख रुपयांचं बक्षीस देण्याचे आव्हान देत लक्ष वेधले आहे. पण बागेश्वर सरकार महाराजांनी नागपूरमध्ये हे आव्हान न स्वीकारता त्यांच्या रायपूर दरबारात या, आम्ही समाधान करू या शब्दात हे आव्हान स्वीकारले आहे. तसे न करता त्यांनी नागपुरात पत्रकार परिषदेत आमचे आव्हान स्वीकारावे, असे आवाहन श्‍याम मानव यांनी येथे केले.

कोणताही दावा करताना माहिती गोळा करण्याची वेगवेगळी माध्यमे वापरली जाते. आम्ही अनेक भोंदू बाबांच्या दाव्यांचा नागपुरात पर्दाफाश केला आहे. त्यामुळे दावा करणाऱ्यांपर्यंत कोणतीही माहिती पोहोचू नये, याची काळजी घेऊन ही आव्हान प्रक्रिया वैज्ञानिक कसोट्यांवर पार पडणार. त्यामळे बागेश्वर महाराजांची ही आव्हान प्रक्रिया महाराजांच्या दरबारात पार पडणार नाही तर नागपूरमधील सर्व पत्रकारांसमोर होईल. त्यासाठी एक तटस्थ पंचसमिती नेमली जाईल, अशी रोखठोक भूमिका अंनिसचे संस्थापक श्याम मानव यांनी जाहीर केली आहे.

धीरेंद्र महाराजांकडे माहिती मिळविण्याच्या विविध यंत्रणा आहेत. त्यामुळे त्यांनी हे आव्हान त्यांच्या दरबारात नाही, तर नागपूर येथे पत्रकार परिषदेत पंचसमितीच्या समोरच स्वीकारावे यावर मानव ठाम आहेत. ९ जानेवारीला आम्ही पत्रकार परिषद घेऊन धीरेंद्र महाराज दिव्य दरबारात जे दावे करतात त्याला आव्हान दिले आहे.

महाराज दावा करतात की, ते भक्तांचे नाव आपोआप ओळखतात, भक्तांच्या वडिलांचं नाव आपोआप ओळखतात. एवढंच नव्हे तर त्यांचं वय आणि मोबाईल नंबरही सांगतात. श्याम मानव म्हणाले, धीरेंद्र महाराजांच्या दाव्यांना अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने रीतसर वैज्ञानिक कसोट्यांवर आव्हान दिलं आहे. आम्ही पत्रकार परिषद घेऊन लिखित स्वरूपात हे आव्हान दिले असल्याने त्यांनी हिंमत दाखवावी, नागपुरात येऊन हे आव्हान स्वीकारले पाहिजे असेही मानव म्‍हणाले.

महाराज रिकामटेकडे नाहीत, आव्हान देणाऱ्यांनीच रायपूरला जावे, आपले समाधान करून घ्यावे, महाराज सध्या 450 बेडेड हॉस्पिटल निर्मितीसाठी व्यस्त आहेत असे सांगत नागपुरातील कार्यक्रम आयोजित करणारे आमदार मोहन मते यांनी अंनिसला लक्ष्य केले आहे. इतर धर्मीयांवरही बोलण्याची हिंमत दाखवावी, असे आव्हानही त्‍यांनी दिले.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT