Latest

‘एनआयएची’ बाजू मांडण्यासाठी केंद्राकडून विशेष वकिलांची नियुक्ती

नंदू लटके

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा- केंद्र सरकारने चार वकिलांची विशेष वकील म्हणून नियुक्ती केली आहे. हे वकील पीएफआय तसेच शेतकरी नेते अखिल गोगोई यांच्याशी संबंधी प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) वतीने विशेष एनआयए न्यायालयासह गुवाहाटी, केरळ, राजस्थान तसेच चेन्नई उच्च न्यायालयात बाजू मांडतील. गृह मंत्रालयाने एक नोटीस जारी करीत माखन फुकन,अजित कुमार एस, स्नेहदीप ख्यालिया तसेच एन.भास्करन यांची नियुक्ती केली आहे.

मंत्रालयाने नोटीस जारी केल्याच्या दिवसापासून तीन वर्षापर्यंत अथवा पुढील आदेशांपर्यंत संबंधित वकिलांची नियुक्ती करण्यात आली आहे.माखन यांची गुवाहाटी उच्च न्यायालयात नियुक्ती करण्यात आली आहे. अजित आणि स्नेहदीप केरळ आणि राजस्थान उच्च न्यायालयात, तर एन.भास्करन चेन्नई येथील एनआयए विशेष न्यायालयात आणि मद्रास उच्च न्यायालयात एनआयएच्या वतीने बाजू मांडतील.

माखन कृषक मुक्ती संग्राम समितीचे (केएमएसएस) अध्यक्ष अखिल गोागोई यांच्या विरोधात एनआयएने दाखल केलेल्या गुन्ह्यात संस्थेची बाजू मांडतील. गोगोई संध्या तुरूंगात आहेत. दशतवादी कृत्यामध्ये कथित भूमिका तसेच सीएए विरोधादरम्यान हिंसाचारात सहभागी असल्याचा ठपका एनआयएने गोगोई यांच्यावर ठेवत त्यांना अटक केली होती.आसाम मधील जोरहाटमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये कायदा आणि सुव्यवस्था लक्षात घेता त्यांना अटक करण्यात आली होती. तर, अँड.अजित, अँड. स्नेहदीप आणि अँड. भास्करन पीएफआय संदर्भात विविध राज्यात दाखल खतल्यात 'एनआयए'ची बाजू मांडतील.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT