पुढारी ऑनलाईन : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) ने १२ वी नंतर १० वी २०२३ परीक्षेचा निकालही आजच जाहीर केला. यावर्षी सीबीएसई इयत्ता १०वीची एकूण उत्तीर्ण टक्केवारी ९३.१२ टक्के एवढी आहे. हा निकाल अधिकृत वेबसाइट – results.cbse.nic.in, cbseresults.nic.in, cbse.gov.in आणि digilocker.gov.in वर पाहाता येईल. विद्यार्थी त्यांचे रोल नंबर, admit card ID, शाळा क्रमांक आणि जन्मतारीखेच्या आधारे त्यांचे गुण तपासू शकतात. या वेबसाइट्स व्यतिरिक्त विद्यार्थ्यांना त्यांचे निकाल उमंग ॲप्सवर देखील पाहायला मिळतील. (CBSE 10th Result 2023)
इयत्ता १० वीच्या उत्तर पत्रिकेचे मूल्यांकन १६ एप्रिलच्यादरम्यान पूर्ण झाले. याआधारे CBSE ने निकाल जाहीर केला आहे. यंदा सुमारे २१ लाख विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. CBSE १० वीची परीक्षा २४ फेब्रुवारी ते १० मार्च दरम्यान घेण्यात आली होती. एकूण ३४.८ लाख विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यात २१.४ लाख मुली आणि १३.४ लाख मुलांचा समावेश होता. २०२२ मध्ये उत्तीर्णतेची टक्केवारी ९९.५ टक्के होती. यंदा उत्तीर्णतेची टक्केवारी कमी झाली आहे.
दरम्यान, आज CBSE ने पहिल्यांदा १२ वी २०२३ परीक्षेचा निकाल जाहीर केला. यंदा १६.६० लाख विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी १४ लाख ५० हजार १७४ विद्यार्थी म्हणजेच ८७.३३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे. यंदा उत्तीर्णतेची टक्केवारी घटली आहे. गेल्या वर्षी ९२.७१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. बारावीत तिरुवनंतपूरम प्रदेश ९९.९१ टक्क्यांसह अव्वल स्थानी आहे. यंदा मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९०.६८ टक्के असून ती मुलांपेक्षा ६.०१ टक्के अधिक आहे. CBSE ने यंदा गुणवत्ता यादी जाहीर केलेली नाही.
results.cbse.nic.in वर जा
10th निकालाच्या पेजवर जा
विचारलेली माहिती भरून लॉग इन करा
तुमचा CBSE निकाल तपासा आणि डाउनलोड करा
-बोर्ड परीक्षेचा रोल नंबर
– ॲडमिट कार्ड
– शाळा क्रमांक
– जन्मतारीख
हे ही वाचा :