पिंपरी : कागदपत्रांच्या आधारे मोबाईलवर कर्ज काढून 'कॅश फंडिंग' (रोकड देणे) करण्याचा नवीन उद्योग मोबाईल दुकानदारांनी सुरू केला आहे. दुकानदारांना फायदा होत असल्याने असे प्रकार सर्रास केले जात आहेत. मात्र, यामध्ये फायनान्स कंपन्या आणि ग्राहकांची फसवणूक होत असल्याचे समोर येऊ लागले आहे.
… असे केले जाते 'कॅश फंडिंग'
मागील काही वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी छोटे कर्ज घेणे अतिशय सोपे झाले आहे. त्यामुळे पैशांची गरज असलेले ग्राहक मोबाईल मार्केटमध्ये जातात. दुकानदारदेखील कागदपत्र घेऊन झिरो डाऊनपेमेंट, इंट्रेस्ट स्कीम असलेल्या मोबाईलवर कर्ज करतात. 25 हजारांच्या मोबाईलवर कर्ज केल्यास ग्राहकाच्या हातात साधारण दहा ते पंधरा हजार रुपयांची रोकड
दिली जाते. त्यानंतर कर्ज केलेला म्हणजेच संबंधित कर्जदाराच्या नावे 'अॅक्टिव्ह' असलेला मोबाईल रोख रकमेत खरेदी करणार्या ग्राहकाला दिला जातो. या व्यवहारात दुकानदाराचा पाच ते दहा हजार रुपयांचा फायदा होतो.
कर्ज बुडव्या ग्राहकामुळे भांडाफोड
कर्जदाराने वेळेवर हप्ते भरल्यास रोख पैसे देऊन मोबाईल घेणार्या ग्राहकाला आपल्या मोबाईलवर कर्ज आहे, याबाबत काहीच माहिती मिळत नाही. ज्या वेळी एखादा कर्जदार हप्ते चुकवतो, त्या वेळी काही कंपन्या पहिल्या तर काही कंपन्या तिसर्या महिन्यांत मोबाईल लॉक करतात. कर्जबुडव्या ग्राहकांमुळे हे रॅकेट उजेडात आले आहे.
हे ही वाचा :