नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : दिल्लीच्या विमानतळावर विमान कंपनी 'गो फर्स्ट' ची एक कार इंडिगो विमान (Indigo Plane) कंपनीच्या 'ए३२०नियो' या विमानच्या चाका खाली आली. यावेळी ती कार पुढील चाकाला अर्थात 'नोज व्हिल' धडकण्यापासून थोडक्यात बचावली. एक मोठी दुर्घटना होण्यापासून यावेळी थोडक्यात बचावली. हा प्रकार दिल्ली विमानतळावर मंगळवारी (दि. २ ऑगस्ट) घडला. यावेळी विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली की, एक मोठी दुर्घटना होण्यापासून टळली आहे. या घटनेने विमानाचे कोणतेही नुकसान झालेले नाही. तरी सुद्धा नागरी विमानवाहतुक महासंचलनालयाकडून सदर घटनेची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
सुत्रांच्या माहितीनुसार, इंडिगो विमान (Indigo Plane) स्टँड नंबर २०१ वर उभारलेले होते. एक गो फर्स्टची कार या विमानाच्या समोर आले. तसेच ती कार अचानक येऊन पुढील चाकाच्या पुढे थांबली. या घटनेने कोणतीही दुर्घटना अथवा नुकसान झालेले नाही. तसेच कोणासही दुखापत झालेली नाही. परंतु अचानक घडलेल्या या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली.
विमानतळाचे सुरक्षा कर्मचारी तात्काळ घटनास्थळी पोहचून कारच्या चालकाला ताब्यात घेतले. यावेळी त्या चालकाने दारुचे सेवन केले आहे का याची तपासणी करण्यात आली. पण, तो या तपासणीत निर्दोष आढळला. या घटनेनंतर काहीसा तणाव जरी निर्माण झाला असला तरी, संबधित इंडिगो कंपनीच्या (Indigo Plane) विमानाने प्रवाशांना घेऊन आपल्या निर्धारीत वेळत उड्डान केले. घडलेल्या सर्व घटनेचा तपास नागरी विमानवाहतुक महासंचलनालयाकडून करण्यात येत आहे.
यावेळी पीटीआयकडून विमान कंपनी 'इंडिगो' आणि कारची कंपनी 'गो फर्स्ट' यांच्या अधिकाऱ्यांशी या घटनेबाबत विचारणा करण्यासाठी संपर्क करण्यात आला. परंतु, या दोन्ही कंपन्यांकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.