पुढारी ऑनलाइन वृत्तसेवा : जम्मू आणि काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात रविवारी रात्री नियंत्रण रेषेवर (एलओसी) अपघाती ग्रेनेड स्फोटात भारतीय लष्कराचा (Army Captaion) एक कॅप्टन आणि एक कनिष्ठ आयोग अधिकाऱ्याचा (जेसीओ) मृत्यू झाला. कॅप्टन आनंद आणि नायब सुभेदार भगवान सिंग अशी मृतांची नावे आहेत.
(Army Captaion) संरक्षण प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल देवेंद्र आनंद (Army Captaion) यांनी सांगितले की, मृतक इतर सैन्यासह त्यावेळी मेंढार सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर आपले कर्तव्य बजावत होते. त्यांना तातडीने हेलिकॉप्टरने उधमपूर येथील लष्कराच्या कमांड हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला, असेही त्यांनी सांगितले.याप्रकरणी कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश देण्यात आले आहेत.
दरम्यान, एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, जनरल ऑफिसर कमांडिंग आणि व्हाईट नाइट कॉर्प्सच्या सर्व श्रेणींनी आपले कर्तव्य बजावताना सर्वोच्च बलिदान दिलेल्या शूर हृदयांचा सन्मान केला. तसेच त्यांनी शोकाकुल कुटुंबीयांचे सांत्वन केले.
हेही वाचा: