पुढारी ऑनलाइन डेस्क : Cape Verde-Boat Overturned : युरोपियन युनियनचे प्रवेशद्वार सजमल्या जाणाऱ्या केप वर्दे जवळ समुद्रात बोट उलटली. या दुर्घटनेत किमान 60 लोकांच्या मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. केप वर्दे हे स्पॅनिश कॅनरी बेटांच्या सागरी स्थलांतरीत मार्गावर आहे. गरिबी आणि युद्धातून पळून गेलेले हजारो निर्वासित आणि स्थलांतरीत या मार्गाने दरवर्षी स्वतःचा जीव धोक्यात घालून प्रवास करतात. दुर्घटनाग्रस्त बोटमध्ये ही सर्व स्थलांतरित होते.
इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मायग्रेशनच्या अधिकाऱ्यांच्या हवाल्याने अल जझीराने दिलेल्या वृत्ताच्या आधारे एएनआयने याची अधिक माहिती दिली आहे. अल जझीराच्या वृत्तानुसार बोट उलटल्याने 60 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर 38 जणांना वाचवण्यात यश आले आहे.
स्थलांतरितांना घेऊन ही बोट जुलैमध्ये सेनेगलहून निघाली होती. पश्चिम आफ्रिकेच्या किनारपट्टीपासून सुमारे 620 किमी (385 मैल) अंतरावर केप वर्दे आहे. केप वर्देच्या वृत्तानुसार दुर्घटनाग्रस्त बोट एक मासेमारी बोट आहे. सेनेगलहून एक महिन्यापूर्वी ही बोट निघाली होती.
सेनेगलच्या परराष्ट्र मंत्रालयाने मंगळवारी उशिरा सांगितले की गिनी-बिसाऊच्या नागरिकांसह 38 जणांना बोटीतून वाचवण्यात आले आहे, असे वृत्त अल जझीराने दिले आहे.
कोस्ट गार्डने दिलेल्या माहितीनुसार, वाचलेल्या आणि मृतांची एकूण संख्या 48 आहे. स्थानिक शवागाराने सांगितले की त्यांना सात मृतदेह मिळाले आहेत. हे जहाज सोमवारी साल बेटापासून जवळजवळ 320km (200 मैल) अंतरावर स्पॅनिश मासेमारी बोटीने दिसले. त्यांनी त्याचवेळी केप वर्दे अधिकाऱ्यांना सतर्क केले, असे पोलिसांनी सांगितले.
स्पॅनिश स्थलांतर वकिल गट वॉकिंग बॉर्डर्सने सांगितले की ही जहाज एक मोठी मासेमारी नौका होती, ज्याला पिरोग म्हणतात. ही बोट 10 जुलै रोजी 100 हून अधिक निर्वासित स्थलांतरितांसह सेनेगलहून निघाली होती. केप वर्दे ही स्पॅनिश कॅनरी बेटांच्या सागरी स्थलांतर मार्गावर आहे. याला युरोपियन युनियनचे प्रवेशद्वार देखील आहे.
अल जझीराने दिलेल्या वृत्तानुसार, गरिबी आणि युद्धातून पळून गेलेले हजारो निर्वासित आणि स्थलांतरित दरवर्षी आपला जीव धोक्यात घालून असा धोकादायक प्रवास करतात. अनेक स्थलांतरित बर्याचदा तस्करांनी पुरवलेल्या माफक बोटी किंवा मोटार चालवलेल्या कॅनोमध्ये प्रवास करतात. हे तस्कर प्रवासासाठी शुल्क आकारतात.
जानेवारीमध्ये, केप वर्दे येथील बचाव पथकांनी सुमारे 90 शरणार्थी आणि स्थलांतरितांना वाचवले, तर जहाजावरील इतर दोन जण मरण पावले. अल जझीरानुसार ते सेनेगल, द गॅम्बिया, गिनी-बिसाऊ आणि सिएरा लिओनचे होते.
हे ही वाचा :