वॉशिंग्टन; वृत्तसंस्था : अमेरिकेतील कॅलिफोर्निया प्रांतात जातिभेद नष्ट करण्यासाठीचे विधेयक 34 विरुद्ध 1 मताने मंजूर झाले आहे. विधेयकाचं रूपांतर कायद्यात झाल्यानंतर अशा प्रकारचा कायदा करणारे हे अमेरिकेसह जगातील पहिले राज्य ठरेल. (Caste Discrimination Bill)
विधेयकावर राज्यपालांनी सही केल्यानंतर या विधेयकांचे रूपांतर कायद्यात होणार आहे. सिनेटर आयेशा वहाब यांनी हे विधेयक सादर केले. (Caste Discrimination Bill)
अमेरिकेतील सीएटल नगर परिषदेमध्ये अलीकडेच जातिभेदावर बंदी आणणारा कायदा मंजूर झाला होता. असा कायदा करणारे अमेरिकेतील हे पहिले शहर ठरले होते.
क्षमा सावंत या मूळ भारतीय युवतीने त्यासाठी लढा उभारला होता. अमेरिकेतील जॉर्जिया विधानसभेनेही हिंदूफोबियाला विरोध करणारा ठराव मंजूर केला होता.
अधिक वाचा :